भडगाव-प्रतिनिधी : तालुक्यातील तांदुळवाडी गावातील पाच तरुणांची देशसेवेसाठी विविध संरक्षण दलांमध्ये निवड झाली आहे. यामुळे गावात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने निवड झालेल्या जवानांची मिरवणुक काढण्यात आली.
निवड झालेल्या जवानांमध्ये अनुज भैयासाहेब महाजन (सीआरपीएफ), नाना पवार (सीआयएसएफ ), अनुराग सुधीर पाटील (बीएसएफ), गौरवअनिल
पाटील (बीएसएफ) व अनंत तुकाराम मोरे (इंडीयन नेव्ही) यांचा समावेश आहे. या प्रसंगी अशोक परदेशी, प्रा. प्रशांत पाटील यांनी जवानांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. या तरुणांनी केलेली मेहनत व देशप्रेम इतर युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. ग्रामस्थांनी “जय हिंद “च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत या जवानांना खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी मिरवणुकीत, खूप तरुण मंडळी, ग्रामस्थ मोठया होते. संख्येने उपस्थित होते.


