चाळीसगाव (प्रतिनिधी) : आज दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता अंतोदय जनसेवा कार्यालय, आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या कार्यालयात *महाराष्ट्र राज्याच्या संत सेवालाल तांडा समृद्धी योजनेचे राज्यस्तरीय समिती समन्वयक तसेच हिंद की चादर समितीचे सदस्य व* *सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भिकन जाधव साहेब यांचा* चाळीसगाव तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने भव्य गौरव व सत्कार करण्यात आला.
संत सेवालाल तांडा समृद्धी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भिकन जाधव साहेब यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सत्कार आयोजित करण्यात आला.
यावेळी बंजारा तांड्यांना महसूल गावाचा दर्जा देणे तसेच नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तांड्यांच्या मूलभूत सुविधा,प्रशासनिक स्वायत्तता व विकासकामांना गती मिळण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास रामदास जाधव, राजूभाऊ राठोड, विजयभाऊ जाधव, नमोताई राठोड, संजय राठोड, बळीराम चव्हाण, साहेबराव राठोड,भरत चव्हाण, डॉ. महेंद्र राठोड,संजय जाधव, यशवंत राठोड,सुदाम चव्हाण, शेषराव चव्हाण,सुनील पवार, गोरख राठोड, देवा जाधव, अमोल चव्हाण, अमोल,रमेश राठोड, राज चव्हाण, विजय राठोड, राजू राठोड, सर, दादाभाऊ चव्हाण, बबलू चव्हाण, रामदास पवार, रामेश्वर राठोड आदी मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना दिनकर राठोड यांनी केली तर आभार प्रदर्शन संजयभाऊ राठोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व उपस्थितांनी सहकार्य केले.
Related Posts
Add A Comment


