अमळनेर ः येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे श्री गणेश जयंती व वसंत पंचमीनिमित्त गुरुवार, दि. 22 जानेवारी रोजी सकाळी श्री विद्याविनायक यागास प्रारंभ झाला होता. शुक्रवार, दि. 23 जानेवारी रोजी दुपारी दोनला द्रौ. रा. कन्या शाळेच्या नऊ विद्यार्थिनींच्या हस्ते श्री विद्याविनायक यागाची पूर्णाहूतीने सांगता झाली. वसंत पंचमीनिमित्त श्री मंगळग्रह देवतेचा केशर जलाद्वारे अभिषेक करण्यात आला.
सुरुवातीला स्थापित देवतांची प्रातःपूजा करण्यात आली. श्री गणेश व सरस्वती मातेचे ब्रह्मनस्पती सुक्त व मेधा सुक्त या यजुर्वेदीय सुक्तांनी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सरस्वती मातेला पांढऱ्या पुष्पाने अर्चन करण्यात आले. त्यानंतर 1 हजार मंत्रांनी सरस्वती मातेस हवन कन्यांच्या माध्यमातून करण्यात आले. या कर्माची सांगतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी व सचिव सुरेश बाविस्कर यांच्या हस्ते पूर्णाहूती पार पडली. त्यानंतर महाआरतीने श्री विद्याविनायक यागाची सांगता झाली. तुषार दीक्षित गुरुजी, प्रसाद भंडारी गुरुजी, वैभव लोकाक्षी गुरुजी, शुभम् वैष्णव गुरुजी, यश जोशी गुरुजी, परशुराम शर्मा गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
………..


