प्रतिनिधी -भडगाव: येथे वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यशवंतनगर पासुन ते पारोळा चौफुली पर्यंत सजविलेल्या ट्रॅक्टरवरुन विर एकलव्या यांच्या मुर्तीची मिरवणुक वाजत गाजत काढण्यात आली. तर पारोळा चौफुली चौकात वीर एकलव्य यांच्या मुर्तीचे पुजन नागरीक, समाज बांधवांनी केले. यावेळी शिवसेना गटनेते लखीचंद पाटील, अशोक परदेशी, विक्रम सोनवणे, हेमंत पाटील, दिनेश महाजन, भगवान शिंदे, किस्मत पहीलवान, देविदास राठोड, चुडामण सोनवणे, भावडु मोरे, अल्ताफ शेख, योगीराज पाटील, निलेश सोनवणे
यांचेसह नागरीकांची उपस्थिती होती. या जयंतीचे नेतृत्व एकलव्य संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रवी सोनवणे, तालुका अध्यक्ष किरण मोरे, शहराध्यक्ष विनोद मोरे, मिथुन गायकवाड, नाना मालचे, हिरामण सोनवणे, जयंती अध्यक्ष भैया गांगुर्डे, उपाध्यक्ष वाट्या राजु गायकवाड, सुनील गायकवाड, सखाराम सोनवणे, राजु अहिरे, श्याम सोनवणे, अर्जुन गायकवाड, बबलु पिंपळे, अनिल पवार, कृष्णा मालचे, समाधान मोरे, विजय मालचे, राहुल सोनवणे, पवन सोनवणे, किशोर मालचे उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.


