जळगाव: दर साला बाद प्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांच्या पवित्र सण ईद उल फित्र ( रमझान ईद) निम्मित जळगाव शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी आज दि.२१/०३/२०२६ शनिवार रोजी सुन्नी मुस्लिम बांधवांच्या सुन्नी ईदगाह मैदान नियाज अली नगर सुप्रीम कॉलोनी जळगाव येथे अत्यंत भक्ती भावात मौलाना जाबीर रजा अमजदी यांच्या नेतृत्वाखाली नमाझे ईद उल फित्र ( रमझान ईदची नमाज) ठीक सकाळी नऊ वाजता अदा ( पठण) करण्यात आली.
सर्व प्रथम सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सुन्नी जामा मस्जिद भिलपुरा चे अध्यक्ष सै . अयाज अली नियाज अली यांनी नमाज पठण साठी आलेल्या सर्व नमाजी बांधवांना ईदगाह ट्रस्ट तर्फे ईद मुबारक म्हणत ईद च्या शुभेच्छा दिल्या.संपूर्ण वर्षभराचे केलेल्या कामाची माहिती दिली तसेच भविष्यात होणाऱ्या योजना मांडल्या. तसेच सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून ईद साजरी करावी असे आवाहन केले. तसेच नमाज पठण करण्यासाठी केलेल्या सहकार्य बद्दल जळगाव ज. श. म. न. पा. चे मा .आयुक्त सो., मा. महापौर सो., आरोग्य अधिकारी उदय पाटील, स्थानिक नगरसेवक व जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन चे आभार मानले.
या प्रसंगी खुतबा मौलाना जाबीर रजा अमजदी यांनी म्हटले, तरिका ए नमाज मौलाना नजमुल हक यांनी म्हटले, सलातो सलाम मौलाना झुबेर आलम यांनी म्हटले. या प्रसंगी ” ए अल्लाह हमारे अझीम मुल्क भारत मे अम्न अमान कायम रख, बेरोजगारी दूर कर, बिमारो को शिफा दे, जमिनी आस्मानी बलाओ से हिफाझत कर ” अशी दुआ ( प्रार्थना) करण्यात आली त्याला सर्वांनी आमिन म्हणत दाद दिली. या प्रसंगी नात ए पाक, दरूद पठण करण्यात आले. या प्रसंगी सुमारे वीस हजार सुन्नी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
या प्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सुन्नी जामा मस्जिद भिलपूरा जळगाव चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रजा अमजदी, मौलाना नजमूल हक, इकबाल वजीर,मौलाना अब्दुल रहीम कादरी, मौलाना झुबेर आलम अशरफी, मौलाना खलील अहमद बरकाती ,मौलाना अब्दुल मतीन, मौलाना अब्दुल हमीद, मुख्तार शाह, सय्यद जावेद, शाकीर चित्तलवाला, झरीफ शेख इ. उपस्थित होते.


