भडगाव : (प्रतिनिधी )कृषी उत्पन्न बाजार समितीपाचोरा-भडगावच्या उपबाजारात नवीन रब्बी हंगामातील मका, ज्वारी, हरभरा व गहू या शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. यामुळे भडगाव येथील उपबाजारआवारात व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन विविध अडचणींवर चर्चा केली.बैठकीत शेतमालाची जाहीर लिलाव पद्धतीने खरेदी-विक्री सुरू करण्याचा संयुक्त निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उपबाजारात जाहीर लिलावाचा शुभारंभ करण्यात आला, अशी माहिती बाजार समितीचे सभापतीगणेश पाटील यांनी दिली.
उपबाजारात शेतमालाचे लिलाव जलद गतीने पार पाडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा, तसेच उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. चोख वजनमाप व तत्काळ देयकाची सुविधाअसल्याने भडगाव उपबाजारात शेतमालाची आवक वाढत आहे. शेतकऱ्यांनी खाजगी ठिकाणी माल विक्री न करता बाजार समितीतच माल आणावा, जेणेकरून फसवणूक टळेल, असे आवाहन सभापतींसह उपसभापती प्रकाश पाटील व संचालक मंडळाने केले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी संचालक लखीचंद पाटील, सचिव बी. बी. बोरुडे, प्रतीक ब्राम्हणे व व्यापारी उपस्थित होते.
असा आहे बाजारभाव
ज्वारीला प्रतिक्विंटल १९५० ते २१०० रुपये, तर मक्याला १५०० ते १८४१ रुपये बाजारभाव मिळत आहे. ज्वारी आवक वाढली २४८ क्विंटल माल खरेदी माहिती संचालकांनी दिली.


