भडगाव -प्रतिनिधी : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा विषय समितीच्या निवडणूक नियम १९६६ मधील नियम ३ नुसार भडगाव नगरपरिषदेची विशेष सभा दि. २० जानेवारी रोजी नगरपरिषद सभागृहात पार पडली.या सभेत नगरपरिसदेच्या विविध विषय समित्यांची स्थापना करण्यात आली. ही सभा पिठासिन अधिकारी तथा भडगाव तहसीलदार शितल सोलाट व प्रभारी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
भडगाव नगरपरिषदेत आज झालेल्या विषय समित्यांची निवड रितसर प्रक्रिया पार पाडून बिनविरोध झाली. या समित्यांमध्ये स्थायी समिती सदस्य -लखीचंद प्रकाश पाटील,सार्वजनिक बांधकाम समिती सभापती – फकीर नगमाबी अलीमशाह,सदस्य- विजयकुमार रायभान भोसले,देवाजी आहीरे,युवराज पाटील,जितेंद्र पाटील ,शिक्षण समिती सभापती -अतुल परदेशी,सदस्य -देवाजी आहीरे
,ज्योती पाटील,योगिता येवले
,अमोल पाटील,आरोग्य समिती सभापती -ईम्रानअली सैय्यद, सदस्य -खलील शेख,विजयकुमार भोसले ,डॉ प्रमोद पाटील,सचिन चोरडिया,
पाणीपुरवठा समिती सभापती- राजेंद्र पाटील, सदस्य,अनुजम बेग मिर्झा ,वैशाली महाजन,करूणा देशमुख,अजनाबाई भिल्ल,
नियोजन समिती सभापती-
डॉ.विजयकुमार देशमुख,राहुल ठाकरे ,योगिता येवले ,रावसाहेब पाटील,अमोल पाटील,महीला व बालकल्याण सभापती- समिक्षा लखीचंद पाटील
सदस्य -कल्पनाबाई भोई ,रजनाबाई वाघ
,वैशाली पाटील ,किरणताई पाटील,अजनाबाई भिल्ल
आदींची विषेश समिती सभापती व सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
प्रतिक्रिया-
भडगाव नगरपरिषदेत आज विशेष समिती सभापती व सदस्यांची निवड आज पार पडली पुढील काळात भडगाव शहराचा कायापालट व विकासात्मक बदल नक्की घडवू व भडगाव शहर स्वच्छ व सुंदर शहर बनवू
लखीचंद पाटील गटनेता,तथा स्थायी समिती सदस्य नगरपरिषद भडगाव


