जळगाव (प्रतिनिधी): ब्रह्माकुमारीज् तर्फे जळगाव नगरीत भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक चेतनेचा अद्भुत संगम साकारत आहे. स्वयंभू, जागृत आणि कल्याणकारी परमेश्वर भगवान महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दिव्य स्मरणार्थ भव्य शिवलिंगाची प्रेरणादायी प्रतिकृती दर्शनाचे उदघाटन संपन्न झाले. प्रतिकृतीचे आयोजन रायसोनी स्कूलच्या पूढील, पूलाखालून जातांना उजवीकडील बेंडाळे ग्राऊंड, पिंप्राळा रोड , पिंप्राळा येथे साकारण्यात आले आहे.
जागृत शिवलिंगाची प्रेरक प्रतिकृती
भारतभूमीतील जागृत ज्योतिर्लिंगांची आध्यात्मिक ऊर्जा जळगावात अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. सुमारे वीस हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या भव्य ज्योतिर्लिंग दर्शन स्थळावर भक्तांना शिवभक्तीचा अनोखा अनुभव मिळणार आहे. यात मेडिटेशनकक्ष, प्रवचन कक्ष, बारा ज्योर्तिलिंग दर्शन उभारण्यात आले आहे.
परमपिता परमात्मा शिव यांचा सत्य परिचय सर्वांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने शिवध्वजाच्या संकल्पनेत उभारलेले प्रदर्शनी कक्ष तयार करण्यात आले आहेत. आदरणीय राजयोगीनी तथा जळगाव सबझोन इन्चार्ज यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाने जळगावकर जनतेच्या आध्यात्मिक सेवेसाठी सेंट्रल बँक कॉलनी पाठशाला यांचे तर्फे चित्र, संदेश आणि आध्यात्मिक विचारांच्या माध्यमातून शिवतत्त्व, आत्मज्ञान आणि जीवनमूल्यांचे सुस्पष्ट दर्शन घडवण्यात येणार आहे.
याप्रसंगी भगवान महाकालेश्वरांची महाआरती माननीय महापौर यांचे हस्ते करण्यात आली. हे दि. १८ फेब्रुवारी पर्यंत सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शनासाठी खूले आहे. आत्मिक अनुभूती आणि दिव्य प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे.


