जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी यांनी प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी पक्षादेश डावलून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या बंडखोर उमेदवारांना कडक इशाराही दिला आहे.
महायुतीचे अधिकृत उमेदवार खालीलप्रमाणे:
प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे. *अधिकृत जाहीर झालेले उमेदवार:*
* प्रभाग १३-अ: सपके नितीन प्रभाकर (भारतीय जनता पक्ष)
* प्रभाग १३-ब: सौ. तायडे सुरेखा नितीन (भारतीय जनता पक्ष)
* प्रभाग १३-क: सौ. पाटील वैशाली अमित (बिनविरोध निवड)
* प्रभाग १३-ड: देवकर प्रफुल्ल गुलाबराव (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
बंडखोरांवर कारवाईचा बडगा
काही इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या सूचनेनंतरही आपली उमेदवारी मागे न घेता अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. हे उमेदवार स्वतःला भाजपचेच उमेदवार भासवून प्रचार करत असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले आहे. अशा उमेदवारांनी येत्या दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट न केल्यास त्यांच्यावर पक्षांतर्फे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्षांनी दिला आहे.
मतदारांना आवाहन
“मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्ह असलेल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करून विजयी करावे,” असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Related Posts
Add A Comment


