जळगाव (राकेश वाणी): काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या निषेधार्थ आज जळगाव शहर भाजपतर्फे आक्रमक पवित्रा घेण्यात आला. रविवारी दुपारी ४ वाजता भाजपच्या जुन्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयापासून सपकाळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा (तिरडी) काढून त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करण्यात आला.
नेमका प्रकार काय?
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवरायांची तुलना टिपू सुलतानशी करून तमाम शिवप्रेमी आणि हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजपने केला आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते.
आंदोलनाचे स्वरूप
* प्रतिकात्मक अंत्ययात्रा: सपकाळ यांच्या पुतळ्याची तिरडी बांधून ही अंत्ययात्रा काढण्यात आली. याचे ‘आग्या’ म्हणून महेश चौधरी होते.
* नेत्यांचा सहभाग: आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महापौर दिपमाला काळे, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ यांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी या तिरडीला खांदा दिला.
* महिला आघाडीचा निषेध: टावर चौकात अंत्ययात्रा पोहोचल्यावर मंगलाताई बारी व महिला कार्यकर्त्यांनी रडून काँग्रेसच्या या भूमिकेचा उपरोधिक आणि तीव्र निषेध नोंदवला.
उपस्थित पदाधिकारी
या आंदोलनात विजय बांदल, नितीन इंगळे, राजेंद्र मराठे, आनंद सपकाळे, मनोज भांडारकर, मुकुंद मेटकर, चंदू महाले, अजित राणे, निळू आबा तायडे, विनोद मराठे, प्रकाश पंडित यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, युवा मोर्चा आणि महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही,” अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली


