अमळनेर | प्रतिनिधी :युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आयोजित मेरा युवा भारत – जळगाव अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा २०२५–२६ नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये डी. आर. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी खो-खो व कबड्डी (मुली) या दोन्ही क्रीडा प्रकारांत विजेतेपद पटकावत दुहेरी यश संपादन केले.
या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा बक्षीस वितरण समारंभ पी.बी.ए. इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. आर. कन्या शाळेचे चेअरमन श्री. योगेशदादा मुंदडा होते. बक्षीस वितरण प्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री तथा अमळनेरचे आमदार दादासाहेब अनिलदादा पाटील उपस्थित होते. यावेळी खा. शि. मं. स्वीकृत सदस्या सौ. वंसुधरा लाडगे, जळगाव समन्वयक श्री. नितीन नेरकर, प्रा. अशोक पवार, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी व प्राचार्य श्री. जे. एस. देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धांचे निकाल
खो-खो (मुली) – विजयी : डी. आर. कन्या शाळा, अमळनेर
कबड्डी (मुली) – विजयी : डी. आर. कन्या शाळा, अमळनेर
कबड्डी (मुले) – विजयी : पी.बी.ए. इंग्लिश स्कूल, अमळनेर
उपविजयी : स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल, अमळनेर
१०० मीटर धावणे
मुले : जयेश गुलाब धनगर (प्रताप कॉलेज), शुभम विनोदकुमार (स्वामी स्कूल), कृष्णा संजय महाजन (प्रताप कॉलेज)
मुली : आरती पंढरीनाथ पाटील (करणखेडा), वैभवी दिनेश खंबायते (डी. आर. कन्या), इन्सिया आतिफ फकरी (स्वामी विवेकानंद)
गोळाफेक
मुली : निकिता प्रविण पाटील (डी. आर. कन्या)
मुले : आदित्य अरुण पाटील, साईदत्त नितीन चौधरी (पी.बी.ए.)
प्राविण्य मिळविलेल्या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते विजयी ट्रॉफी व पदके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख श्री. एस. पी. वाघ यांनी केले, तर आभारप्रदर्शन सौ. आर. एस. सोनवणे यांनी केले.


