जळगाव: जळगाव शहरात ग्रीन सिटी फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने लांडोरखोरी उद्यान येथे स्वर्गस्थ झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याचा विशेष आनंद वाटतो.
प्रिय व्यक्तींच्या आठवणी जपण्याचा हा अत्यंत सुंदर आणि विधायक उपक्रम आहे. वृक्षाच्या रूपाने त्यांचे नाव आणि अस्तित्व निसर्गाच्या सान्निध्यात वर्षानुवर्षे जिवंत राहील, ही संकल्पना मनाला स्पर्श करणारी आहे.
या प्रसंगी विजयकुमार वाणी, प्रा. शमा सराफ, सुबोध सराफ, राहुल वाघ, डॉ. धनंजय बेंद्रे, वसंत माळी, आशिष हाडा यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
आपण लावलेले प्रत्येक झाड केवळ सावली देत नाही, तर आपल्या प्रियजनांच्या आठवणींना एक सकारात्मक, जिवंत रूप देत राहते. अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून जळगाव शहरात याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येतील.
चला, आपणही एक झाड लावूया आणि आठवणींना हरित रूप देऊया.


