भडगाव -प्रतिनिधी : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. स्वागतगीत कु. लावण्या महाजन हिने म्हटले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अजय अहिरे तर प्रमुख अतिथी पोलिस निरीक्षक महेश शर्मा, कवी प्रा. खुशाल कांबळे, उपमुख्याध्यापिका छाया बिऱ्हाडे, पर्यवेक्षक शरद महाजन, अशोक तायडे, उपप्राचार्य संदीप सोनवणे उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा
परिचय प्रा. शरद पाटील यांनी करुन दिला. प्रास्ताविक संदीप सोनवणे यांनी केले. यावेळी कॉपीमुक्त अभियान, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत परीक्षा, शिक्षासूची, विविध सुचना याविषयी माहिती दिली, शालेय गुणवत्तेची परंपरा सांगितली. महेश शर्मा पोलिस निरीक्षक यांनी ध्येय निश्चित करून योग्य दिशेने वाटचाल करावी अअसे मार्गदर्शन केले. प्रा. खुशाल कांबळे यांनी जीवनात आरोग्य हीच संपत्ती असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षक मनोगतातून प्रा. रेखा कोसोदे यांनी विद्यार्थ्यांना
शुभेच्छा दिल्यात. विद्यार्थ्यांनी मनोगतातून शालेय आठवणीना उजाळा देऊन कॉलेजबद्दल ऋण व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपातून अजय अहिरे यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात भरपूर अभ्यास करा व आपल्या कॉलेजचे नाव उज्ज्वल करा असे आवाहन केले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक नितीन सोनजे, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख किरण पाटील हेही उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. सुयोग झंवर तर आभार प्रा. सुनिल पाटील यांनी मानले.


