अमळनेर (राकेश वाणी): अमळनेर नगरपरिषद 2025 सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार प्रचार सुरू केला आहे. सोमवारी अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये आज शिवसेनेच्या उमेदवाराद्वारे एका भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांच्यासह प्रभाग क्र. १४ (अ) चे उमेदवार सौ. ज्योती पंकज शेटे आणि प्रभाग क्रमांक ब चे उमेदवार प्रवीणकुमार शशिकांत पाठक यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ देखील फोडण्यात आला. प्रचार रॅलीद्वारे प्रभागातील जनतेशी भेटीगाठी व जनसंवाद करण्यात आला, यामध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मतदारांशी थेट संवाद साधत शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
* शुभारंभ: प्रचाराची सुरुवात ‘नारळ फोडून’ करण्यात आली, जो प्रचाराचा पारंपरिक आणि शुभ मानला जाणारा विधी आहे.
* जनसंपर्क: प्रचाराच्या वेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. उमेदवारांनी प्रभागातील मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकरूपी ‘माय-बाप’ यांचा आशीर्वाद घेतला.
* विजय निर्धार: उपस्थित जनसमुदायाच्या साक्षीने, मोठ्या मताधिक्याने विजय संपादन करण्याचा ठाम निर्धार सर्व उमेदवारांनी व्यक्त केला. या प्रचार शुभारंभाला शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


