जळगाव: जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत प्रभाग क्र. ६ (ब) मधील वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. *अपक्ष उमेदवार खलील पठाण यांच्या मातोश्री: खान जहाआराबी बशीर (निशाणी: ऑटो रिक्षा)* यांच्या प्रचारार्थ आज शाहूनगर परिसरात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत मालेगावचे प्रसिद्ध खान्देश स्टार नम्या टिकम आणि खानदेशी पैलवान तसेच प्रमुख चेहरा म्हणून खलील पठाण यांची विशेष उपस्थिती असल्याने तरुणाईमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी
रॅलीची सुरुवात होताच ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आपल्या लाडक्या कलाकाराला आणि उमेदवाराला पाहण्यासाठी शाहूनगर भागात नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. महिलांनी घराबाहेर येऊन उमेदवाराचे औक्षण केले आणि घरोघरी हार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
*प्रचाराचे मुख्य मुद्दे आणि ध्येय*
“ना स्वार्थासाठी, ना सत्तेसाठी, मी लढतोय फक्त प्रभागाच्या विकासासाठी” हे ब्रीदवाक्य घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या खान जहाआराबी बशीर यांनी जनसंपर्कावर भर दिला आहे. रॅली दरम्यान खालील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला:
*जनतेची सेवा हाच ध्यास:* राजकारण विरहित केवळ लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्धता.
* प्रभागाचा कायापालट: रस्ते, पाणी आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारणे.
* विश्वासाचा विकास: केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून विश्वास संपादन करणे.
‘५’ नंबरच्या बटणावर शिक्कामोर्तब करण्याचे आवाहन
रॅलीच्या समारोपप्रसंगी बोलताना नम्या टिकम यांनी मतदारांना आवाहन केले की, प्रभागाच्या खऱ्या विकासासाठी अनुक्रमांक ५ समोरील ‘ऑटो रिक्षा’ या बटणावर दाबून खान जहाआराबी बशीर यांना भरघोस मतांनी विजयी करावे.
या रॅलीमुळे प्रभाग क्र. ६ (ब) मध्ये अपक्ष उमेदवाराने आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले असून, मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.


