नाशिक: भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व विभागीय प्रसिद्धीप्रमुख यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नाशिकमधून प्रवक्तेपदी अजित चव्हाण आणि लक्ष्मण सावजी यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, गोविंद बोरसे यांची उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुखपदी सलग तिसऱ्यांदा फेरनिवड (हॅट्ट्रिक) झाली आहे.
दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव
या निवडीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, भारती पवार, जयकुमार रावल आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच नाशिकमधील आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, राहुल ढिकले आणि नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांनी या निवडीचे स्वागत केले आहे.
जबाबदारी सार्थ ठरवू: नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निर्धार
आपल्या निवडीनंतर भावना व्यक्त करताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “पक्षाने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो आम्ही कामाच्या माध्यमातून सार्थ ठरवू. राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचे आम्ही आभार मानतो. माध्यम विभागाची रचना जिल्हा स्तरापासून ते मंडल स्तरापर्यंत अधिक प्रभावीपणे राबवण्याचा आमचा मानस आहे. सरकारच्या आणि पक्षाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
विभागीय प्रसिद्धीप्रमुख व प्रदेश प्रवक्ते
विभागीय प्रसिद्धीप्रमुख म्हणून कोकण – सतीश धारप, ठाणे – दीपेश म्हात्रे, पालघर – समीर पाटील, पूर्व विदर्भ – कल्पना नालष्कर, पश्चिम विदर्भ – अनु शर्मा आणि पश्चिम महाराष्ट्र – संजय मयेकर यांची निवड झाली आहे.
तर प्रदेश प्रवक्ते म्हणून विश्वास पाठक, लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण, अवधूत वाघ, गणेश खाणकर, श्वेता शालिनी, शिवराय कुलकर्णी, राम कुलकर्णी, विनोद वाघ, अतुल शहा, गणेश हाके, कुणाल टिळक, विनायक आंबेकर, राजीव पांडे, पंकज मोदी, आसिफ भाबला, जितेन गजरिया, प्रीती गांधी, शिवानी दानी, अजय पाठक आणि समीर भाकरे यांची वर्णी लागली आहे.


