अमळनेर: येत्या १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा पारदर्शक आणि पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात, या मागणीसाठी अमळनेर खासगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या (PTA) वतीने आज, ९ फेब्रुवारी रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट
संखटनेच्या वतीने अमळनेरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ‘पीटीए’ संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, स्वर्णदीप राजपूत, सुधीर टाकणे, सुनील पाटील यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनातील प्रमुख मुद्दे:
* प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान: गेल्या काही वर्षांतील परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपीचे प्रकार घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे गुणांचा फुगवटा वाढून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
* गुणवत्तेची जपणूक: परीक्षा केंद्रांवर कडक शिस्त नसल्यास प्रामाणिकपणे वर्षभर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होते.
* राज्यव्यापी मोहीम: ‘पीटीए’ संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात हे कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे.
कठोर कारवाईची मागणी
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख, भरारी पथकांचे नियंत्रण आणि कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्याची विनंती संघटनेने केली आहे. परीक्षांमधील प्रामाणिकता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


