उज्वल यशाची परंपरा कायम!
प्रतिनिधी| अमळनेर : येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एच एस सी बोर्ड परीक्षा मार्च- २०२६ चा निकाल ९९ टक्के लागला असून तालुक्यात उज्वल यशाची परंपरा कायम जोपासली आहे.
महाविद्यालयाच्या कला, व विज्ञान शाखेतून एकूण ७४८ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते.
इ.१२ वी विज्ञान शाखेत कु सार्थक रितेश मगर याने ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक ,कु.अनुष्का सोपान पाटील हिने ८९ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु.देवयानी चंद्रकांत पाटील हिने ८८.८३ गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला आहे.
इ. १२ वी कला शाखेत कु.निराली पोपट गव्हाणे हिने ८६.८३ गुण मिळवून प्रथम क्रमांक,उजैफ खान फारुख खान पठाण ह्याने ८१.३३ टक्के मिळून द्वितीय क्रमांक तर
कु.जिया कुवरसिंग तेली हिने ८०.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील ,उपाध्यक्ष रावसाहेब के.डी पाटील ,खजिनदार दादासो.शैलेंद्र दत्तात्रेय पाटील , संचालक बापूसो नंदकुमार डी. पाटील संचालिका डॉ.प्रा. सौ.नयना कैलास पाटील व सर्व संचालक मंडळाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील व विज्ञान विभाग प्रमुख डॉ पी.डी पाटील तसेच कला व विज्ञान विभागातील सर्व शिक्षक व विषय शिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने एच. एस. सी बोर्ड परीक्षा- २०२६ मध्ये घवघवीत यश मिळविल्याबद्ल यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


