भडगांव (प्रतिनिधी) :भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्यातील भडगाव मंडलाची आज कार्यकारणी जाहीर करण्यात आली, भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्यातील भडगाव मंडलाची कार्यकारणी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशाने, ना. गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेनुसार, मंडल अध्यक्ष विनोद नेरकर यांनी भडगाव भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष पदी देवराम निंबा महाजन यांची निवड जाहीर केली.
देवराम महाजन यांचे भडगाव तालुक्यातील ओबीसी, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील बांधवांचे संघटन असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे
देवराम (आबा) महाजन यांनी भडगांव तालुका दक्षता समिती अशासकीय सदस्य, महाराष्ट्र माळी महासंघ तालुका अध्यक्ष, जिल्हा युवक अध्यक्ष, माळी पंच मंडळ सदस्य अश्या प्रमुख वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या असून भडगांव तालुक्यात सामाजिक श्रेत्रात मोठे काम असून त्याच्या या निवडीचे सर्व श्रेत्रातून अभिनंदन केले जात आहे.


