अमळनेर : जि.प. सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त युवासेना – शिवसेना, अमळनेर यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला आज नागरिकांकडून उत्स्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
या पवित्र उपक्रमात युवासैनिकांसह समाजाभिमुख विचारसरणी जपणाऱ्या अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत रक्तदान केले. “रक्तदान हेच खरे जीवनदान” या भावनेतून प्रत्येक रक्तदात्याने समाजाप्रती आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
शिबिरादरम्यान युवकांची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव प्रकर्षाने जाणवला. गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी युवाशक्ती सज्ज असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले.
यांच्या मार्गदर्शनाखाली
मा आमदार शिरीष दादा चौधरी
नंदुरबार लोकसभा संपर्कप्रमुख शिवसेना व तालुकाप्रमुख शिवसेना गुलाब काशिनाथ पाटील
युवासेना तालुकाप्रमुख राहुल कंजर व शहर प्रमुख प्रवीण पाटील व युवासेना पदाधिकारी यांनी सर्व रक्तदाते, कार्यकर्ते व सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
यापुढेही समाजहिताच्या अशाच विविध उपक्रमांतून गरजूंना मदतीचा हात देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
🙏 मनःपूर्वक आभार!


