जळगाव, दि.१८ – जळगाव शहर महानगर पालिका निवडणुकीत महायुतीचा डंका वाजला असून महापौर महायुतीचा होणार आहे. गट स्थापन केल्यानंतर याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणुकीत जनतेने माझ्याबाजूने, विकासाला कौल दिला आहे. मतदानाच्या दिवशी जो प्रकार घडला आणि माझ्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी दिली आहे. प्रभाग ५ मधून विजयी झाल्यानंतर नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विष्णू भंगाळे म्हणाले की, जळगावात महायुती म्हणून आम्ही लढलो आणि आम्हाला भरपूर यश मिळाले. जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. आम्ही आमचे नेते गुलाबराव…
Author: Chetan Wani
प्रतिनिधी : हुशारी ही केवळ गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रांवरूनच ठरते का ? असा प्रश्न उपस्थित करत व्याख्याते शैलेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. आज प्रमाणपत्रासाठी शिक्षण घ्यावे, असा अट्टाहास केला जातो. मात्र केवळ प्रमाणपत्रासाठी शिक्षण नको, तर आयुष्यभर चालणारे आपले शिकणे प्रमाणित करता आले पाहिजे. सध्या शिक्षित व अशिक्षित यांच्यातील फरक जाणवत नाही. अनेकदा शिकलेले लोकही अडाणीपणाने वागतात, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे दि. १७ रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज, भालोद, ता. यावल येथे माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे प्रथम…
चाळीसगाव (प्रतिनिधी) : आज दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता अंतोदय जनसेवा कार्यालय, आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या कार्यालयात *महाराष्ट्र राज्याच्या संत सेवालाल तांडा समृद्धी योजनेचे राज्यस्तरीय समिती समन्वयक तसेच हिंद की चादर समितीचे सदस्य व* *सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भिकन जाधव साहेब यांचा* चाळीसगाव तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने भव्य गौरव व सत्कार करण्यात आला. संत सेवालाल तांडा समृद्धी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भिकन जाधव साहेब यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी बंजारा तांड्यांना महसूल गावाचा दर्जा देणे तसेच नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तांड्यांच्या मूलभूत सुविधा,प्रशासनिक…
जळगाव: निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी, प्रभाग क्रमांक ५ मधील सर्व बोगस आणि दुबार नोंदणी असलेल्या मतदारांवर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उमेदवार ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. *नेमके प्रकरण काय?* नुकतीच निवडणूक मतदार यादी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ५ मध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे समोर आले होते. या यादीत अनेक मतदारांची नावे दोन वेळा असणे, प्रभागात राहत नसतानाही नावे नोंदवणे आणि संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी करणे असे प्रकार उघडकीस आले होते. ॲड. पियूष पाटील यांचा आक्रमक पवित्रा…
जळगाव: प्रभाग ५ च्या रणसंग्रामात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात अपक्ष उमेदवार पियूष नरेंद्र पाटील यांनी काढलेल्या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. ही केवळ रॅली नसून एक अभूतपूर्व ‘जनसागर’ असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे आणि पियूष पाटील यांच्यातील ही लढत आता खऱ्या अर्थाने ‘काटे की टक्कर’ ठरत असून, प्रत्यक्ष मैदानात मात्र जनमत पियूष पाटील यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. ऐतिहासिक रॅली आणि अफाट जनसागर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पियूष पाटील यांनी आपल्या ‘कपबशी’ या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी काढलेल्या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. रॅलीच्या मार्गावर जिथे पाहावे तिथे केवळ डोकीच दिसत होती. या अफाट जनसमुदायाने विरोधकांच्या…
जळगाव: जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज थांबली. प्रभाग क्र. २ (ब) मधील अपक्ष उमेदवार सौ. सोनवणे शुभांगी अक्षय यांच्या प्रचाराने आज कळस गाठला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढलेल्या रॅलीमध्ये महिला आणि युवकांचा अलोट प्रतिसाद पाहता, विरोधकांच्या गोटात चांगलीच धास्ती निर्माण झाली असल्याचे चित्र दिसत आहे. महिला व युवकांचा ‘बॅट’ला वाढता पाठिंबा सकाळपासूनच प्रभागात शुभांगी सोनवणे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. विशेषतः महिला बचत गटातील महिलांनी आणि स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनी ‘बॅट’ हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कंबर कसली आहे. “आपला प्रभाग, आपला विकास” आणि “परिवर्तनासाठी एक मत” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. वचननाम्यातील प्रमुख मुद्दे ठरतायत आकर्षणाचे केंद्र शुभांगी…
(जळगाव): प्रभाग ४ मधील निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार कंचन चेतन सनकत (अ) आणि चेतन गणेश सनकत (क) यांच्या समर्थनासाठी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मतदारांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता विरोधकांच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली असून, ‘जनमत’ अपक्ष उमेदवारांच्या बाजूने असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भव्य रॅली आणि जनसागराचा पाठिंबा सकाळी प्रभागातील मुख्य चौकातून रॅलीला सुरुवात झाली. हातात चिन्हे आणि विजयाच्या घोषणा देत हजारो कार्यकर्ते आणि नागरिक रॅलीत सहभागी झाले होते. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हे या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. प्रत्येक गल्लीत आणि कोपऱ्यावर उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रमुख ठळक मुद्दे: *…
जळगाव: प्रभाग क्रमांक १२ ‘अ’ मधील अपक्ष उमेदवार इंजि. नितीश कैलास कापडणे (निशाणी: फुगा, अनुक्रमांक: ३) यांच्या निवडणूक प्रचाराने आता मोठी गती घेतली आहे. आज ओमकारेश्वर मंदिर येथून नारळ वाढवून त्यांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इंजि. कापडणे यांच्या विजयासाठी महादेवाला साकडे घातले. साधूंच्या आशीर्वादाने रॅलीत चैतन्य प्रचार रॅली सुरू असतानाच एक विलक्षण योग जुळून आला. प्रयागराजकडे मार्गस्थ होत असलेल्या नागा साधू महाराजांनी रॅली पाहून आपला ताफा थांबवला आणि इंजि. नितीश कापडणे यांना विजयाचा आशीर्वाद दिला. या अनपेक्षित प्रसंगामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, हा आशीर्वादाचा हात विजयाची नांदी असल्याची…
जळगाव (राकेश वाणी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, प्रभाग क्र. ५ मधील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या ‘महारॅली’ने शहराचे लक्ष वेधून घेतले. *राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन व पॅनल प्रमुख नितीन लढ्ढा* यांच्या हस्ते हनुमान मंदिरात नारळ वाढवून या प्रचार दौऱ्याचा भव्य शुभारंभ करण्यात आला. दिग्गजांची उपस्थिती आणि उत्साह: रॅलीमध्ये जळगाव जिल्हाचे खासदार स्मिता वाघ, शहराचे आमदार सुरेश भोळे, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपाइं महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या…
जळगाव: जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत प्रभाग क्र. ६ (ब) मधील वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. *अपक्ष उमेदवार खलील पठाण यांच्या मातोश्री: खान जहाआराबी बशीर (निशाणी: ऑटो रिक्षा)* यांच्या प्रचारार्थ आज शाहूनगर परिसरात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत मालेगावचे प्रसिद्ध खान्देश स्टार नम्या टिकम आणि खानदेशी पैलवान तसेच प्रमुख चेहरा म्हणून खलील पठाण यांची विशेष उपस्थिती असल्याने तरुणाईमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी रॅलीची सुरुवात होताच ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आपल्या लाडक्या कलाकाराला आणि उमेदवाराला पाहण्यासाठी शाहूनगर भागात…

