डिजिटल पिढी(राकेश वाणी): केंद्र सरकारचा अर्थसंकल्प २०२६–२७ हा विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा, महिला व युवकांना केंद्रस्थानी ठेवणारा आणि सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट आराखडा मांडणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार अमोल जावळे यांनी दिली. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि मानवी विकासावर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या अर्थसंकल्पात १२ लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांसाठीची तरतूद, हायस्पीड कॉरिडॉर, राष्ट्रीय जलमार्ग आणि ग्रीन मोबिलिटीमुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून, याचा थेट लाभ युवकांना मिळणार आहे. कौशल्य विकास, स्टार्टअप्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा शक्ती देशाच्या आर्थिक घोडदौडीचा प्रमुख आधार ठरेल, असे आ. जावळे म्हणाले. महिला सक्षमीकरण हे या…
Author: Chetan Wani
डिजिटल पिढी/राकेश वाणी: आपण एखाद्या उत्पादनाबद्दल किंवा ब्रँडबद्दल मित्रांशी बोलतो आणि काही वेळातच त्या वस्तूची जाहिरात आपल्या फेसबुक किंवा इन्स्टाग्राम फीडवर दिसते. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल. यामुळेच सध्या एक मोठी चर्चा सुरू आहे— “गूगल आपल्या नकळत आपले बोलणे रेकॉर्ड करते का?” या प्रश्नाचे उत्तर तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे असले तरी, यामागे ‘Google Voice Activity’ हे फिचर महत्त्वाची भूमिका बजावते. Google Voice Activity नक्की काय आहे? ‘गूगल व्हॉइस अॅक्टिव्हिटी’ हे तुमच्या गूगल अकाउंटमधील एक असे फिचर आहे, जे तुमच्या आवाजातील कमांड्स साठवून ठेवते. जेव्हा तुम्ही “Ok Google” किंवा “Hey Google” असे म्हणता, तेव्हा त्यानंतरचे तुमचे बोलणे ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात सेव्ह केले…
अहमदाबाद: आधुनिक युगात जिथे तंत्रज्ञान मुलांचे लक्ष वेधून घेत आहे, तिथे आध्यात्मिक शिस्त आणि एकाग्रतेच्या जोरावर १२,७२३ बालकांनी एक नवा जागतिक इतिहास रचला आहे. ‘सत्संग दीक्षा’ ग्रंथातील तब्बल ३१५ संस्कृत श्लोक मुखोद्गत (कंठस्थ) करून या बाल विद्वानांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. एक अलौकिक आध्यात्मिक उपक्रम BAPS स्वामीनारायण संस्थेच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात हजारो मुलांनी सहभाग घेतला होता. कठीण संस्कृत श्लोक, त्यांचे अचूक उच्चार आणि पाठांतर यांमधील मुलांच्या कौशल्याने संपूर्ण जगाला थक्क केले आहे. केवळ पाठांतरच नव्हे, तर या मुलांनी दाखवलेली मानसिक दृढता हा या विक्रमाचा मुख्य आधार ठरला. हे यश बाल विद्वानांच्या मेहनतीला…
डिजिटल पिढी (राकेश वाणी) : आयडियल सेल्स असोसिएशन, जळगाव यांच्या वतीने सेल्स क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा “आयडियल सेल्स प्रीमियर लीग व पारितोषिक वितरण समारंभ” यशस्वीरीत्या पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहरात सक्रिय असलेल्या आयडियल सेल्स असोसिएशनने सेल्स क्षेत्राशी निगडित लोकांसाठी जिल्हास्तरीय या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश खेळाडूंची गुणवत्ता ओळखणे व त्यांच्या कौशल्यांना अधिक वाव देणे हा होता. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून सेल्स क्षेत्रातील व्यक्तींमध्ये आपसी एकोपा, बंधुभाव व सौहार्द निर्माण व्हावे, परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी, एकमेकांचा परिचय वाढावा तसेच व्यावसायिक, सामाजिक व नैतिक विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न अधिक बळकट व्हावेत,…
डिजिटल पिढी: राकेश वाणी : अखेर जळगाव महानगरपालिकेचे महापौर पदी भाजपच्या दीपमाला काळे व उपमहापौर पदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची वर्णी लागली. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले आणि त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपकडून या पदासाठी प्रामुख्याने तीन महिला नगरसेवकांची नावे चर्चेत होती. प्रभाग क्रमांक 12 मधून बिनविरोध निवडून आलेल्या उज्वला बेंडाळे, प्रभाग क्रमांक 7 मधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला काळे तसेच प्रभाग क्रमांक 13 मधील वैशाली पाटील यांच्यात चुरस निर्माण झाल्याचे चित्र होते. दरम्यान, आज महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी महायुतीकडून नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. राज्याचे मंत्री…
डिजिटल पिढी, राकेश वाणी: पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’चा विशेष पदग्रहण सोहळा रविवारी, १ फेब्रुवारी रोजी येथील पद्मालय विश्रामगृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात संघटनेच्या राज्य, विभाग आणि जिल्हास्तरीय नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हाध्यक्षपदी चेतन वाणी यांची निवड करण्यात आली. प्रमुख नियुक्त्या आणि जबाबदाऱ्या कार्यक्रमात संघटनेच्या विस्तारासाठी अनुभवी आणि कल्पक नेतृत्वाची निवड करण्यात आली. यामध्ये प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत: • प्रदेश उपाध्यक्ष : विनायकराव दिवटे • उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष : वसंत दिलीप पाटील • उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष : मुराद पटेल (चाळीसगाव) • उत्तर महाराष्ट्र सचिव : मंगल पाटील • उत्तर महाराष्ट्र…
वाहनफेरीला नवनिर्वाचित नगरसेवकांसह शेकडो धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! जळगाव – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार उघड करण्यासाठी, धर्मशिक्षणाने हिंदूंना संघटित करणे आणि ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वावरी संघटना यांच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी शहरात वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. फेरीत भगवे ध्वज, भगवे फेटे, टोप्या घातलेले हिंदू आणि ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !’, ‘भारत मातेचा विजय असो !’, ‘हिंदू एकजुटीचा विजय असो !’, ‘हिंदूंनो जागे व्हा !’, ‘वंदे मातरम् !’ अशा घोषणांनी शहर भगवेमय झाले. या वातावरणात शौर्य आणि चैतन्याची लहर उसळली. फेरीसाठी सनातन संस्थेच्या…
अजित पवारांच्या निधनानंतर सोपवली महत्त्वाची जबाबदारी डिजिटल पिढी न्यूज l मुंबई l ३१ जानेवारी २०२६ l राज्याच्या राजकारणातील एक मोठी घडामोड समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. शनिवारी सायंकाळी त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या नियुक्तीमुळे सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राजकीय घडामोडींचा वेगवान प्रवास शपथविधीपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वसंमतीने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. गटनेतेपदी निवड होताच त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला.…
अमळनेर (पंकज शेटे): देशात शेतीच्या जमिनीतील कार्बन पातळी सतत घटत असून सुपीकता कमी होत चालली आहे. पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी देशातील प्रमुख संस्थांनी 2021 मध्ये सामाजिक स्तरावर भूमी सुपोषण व संरक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर जनजागरण अभियान सुरू केले. या अभियानामध्ये कृषी व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत सामाजिक व धार्मिक संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारतातील हजारो गावांमध्ये भूमिपूजन कार्यक्रमांच्या माध्यमातून भूमी सुपोषण व संरक्षण कार्याला चालना मिळाली. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता भूमीबाबत जागरूक होत आहेत .रासायनिकमुक्त शेतीकडे वळत आहेत. त्याचाच भाग म्हणून अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात १९ मार्च 2026 म्हणजेच गुढीपाडव्यास या…
अमळनेर | प्रतिनिधी :युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आयोजित मेरा युवा भारत – जळगाव अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा २०२५–२६ नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये डी. आर. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी खो-खो व कबड्डी (मुली) या दोन्ही क्रीडा प्रकारांत विजेतेपद पटकावत दुहेरी यश संपादन केले. या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा बक्षीस वितरण समारंभ पी.बी.ए. इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. आर. कन्या शाळेचे चेअरमन श्री. योगेशदादा मुंदडा होते. बक्षीस वितरण प्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री तथा अमळनेरचे आमदार दादासाहेब अनिलदादा पाटील उपस्थित होते. यावेळी खा. शि. मं. स्वीकृत सदस्या सौ. वंसुधरा…

