अमळनेर: येत्या १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा पारदर्शक आणि पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात, या मागणीसाठी अमळनेर खासगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या (PTA) वतीने आज, ९ फेब्रुवारी रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट संखटनेच्या वतीने अमळनेरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ‘पीटीए’ संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, स्वर्णदीप राजपूत, सुधीर टाकणे, सुनील पाटील यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनातील प्रमुख मुद्दे: * प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान: गेल्या काही वर्षांतील परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपीचे प्रकार घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे गुणांचा फुगवटा वाढून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत…
Author: Chetan Wani
भडगाव-प्रतिनिधी : भडगाव क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासण्याच्या उद्देशाने भडगाव तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘आमदार चषक’ (पर्व तिसरे) ही भव्य-दिव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा प्रचंड उत्साहात पार पडली. या अटीतटीच्या स्पर्धेत आशीर्वाद रॉकर्स संघाने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर विजेतेपदावर नाव कोरले, तर इतिहास ११ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्वर्गीय बापूजी फाऊंडेशनचे संस्थापक लखिचंद पाटील यांच्या वतीने या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे शानदार उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भडगावच्या क्रीडा इतिहासातील ही पहिलीच डे-नाईट स्पर्धा असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये सुरुवाती पासूनच मोठी उत्सुकता होती. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण ८ नामांकित संघांनी…
‘गण गण गणात बोते’ चा जयघोष, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जळगाव (प्रतिनिधी) : संत श्री गजानन महाराज यांचा १४८ वा प्रकटदिन सोहळ्यानिमित्त आज रविवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी महाजन परिवारातर्फे कांचन नगर परिसरात भक्तिमय वातावरणात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर न्हाहाळुन गेला होता. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने पालखीत सहभागी झाले होते. दरवर्षीप्रमाणे महाजन परिवारातर्फे श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्त महाजन आर्ट, कांचन नगर, कालिंका माता मंदिराजवळ विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी ही परंपरा कायम ठेवली जात असून यंदाचे हे २५ वे वर्ष आहे. या ठिकाणी दि. ४…
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी व्यक्त केला विश्वास; महाराष्ट्राला ‘आर्थिक महासत्ता’ बनवण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनवण्याच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी केले आहे. हा अर्थसंकल्प युवा शक्ती, महिला, शेतकरी आणि गरीब या चार स्तंभांवर लक्ष केंद्रित करणारा असून महाराष्ट्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनवणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे: १. पायाभूत सुविधा आणि रेल्वेचा कायापालट: * महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी १५,९४० कोटी…
मुख्याधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ३३ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित; १ एकर जागा त्वरित देण्याची मागणी चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर ४२५/क मधील हिंदू स्मशानभूमीसाठी मंजूर असलेली १ एकर जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय जनमंच पक्ष मैदानात उतरला आहे. याबाबत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, तांत्रिक अहवाल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. काय आहे नेमके प्रकरण? चाळीसगाव शहरातील मालेगाव-धुळे रोड चौफुली भागातील महाराणा प्रताप चौकाच्या मागे, सर्वे नंबर ४२५/क मधील १.१७ हेक्टर आर (पावणे तीन एकर) जागा विविध समाजांच्या स्मशानभूमीसाठी नगरपालिकेने…
चोपडा : चोपडा येथील सी.बी.एस.ई. बोर्डाशी संलग्न असलेल्या पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला CED फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘NEP–2020 अंमलबजावणीतील अग्रणी’ पंचतारांकित पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण समारंभात भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या NIOS चे उपसंचालक आलोक कुमार गुप्ता, नोएडा फिल्म सिटीचे संस्थापक डॉ. संदीप मारवा तसेच प्रियदर्शी नायक यांच्या हस्ते पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी सौ. दिपाली पंकज बोरोले व शाळेचे प्राचार्य मिलिंद पाटील यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील सुमारे २९ हजार सीबीएसई शाळांमधून शेकडो शाळांची काटेकोर निवड प्रक्रिया पार पाडून पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलची निवड करण्यात आली.…
दोषींवर कठोर कारवाईचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकरी गावात दिनांक २७ जानेवारी रोजी दोन अल्पवयीन शाळकरी मुलींच्या झालेल्या निर्घृण हत्येची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र शोकभावना व अस्वस्थता पसरली आहे. अत्यंत अमानुष पद्धतीने घडलेल्या या दुहेरी हत्येमुळे दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साकरी गावातील पीडित चौधरी व महाजन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी मृत मुलींच्या पालकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला तसेच संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणातील दोषींवर केली जाईल,असे स्पष्ट करत या प्रकरणावर…
डिजिटल पिढी (राकेश वाणी): तुम्ही जर नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, पण बजेटमुळे अडखळत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. दिग्गज रिटेल स्टोअर ‘क्रोमा’ (Croma) सध्या Apple च्या लेटेस्ट iPhone 16e मॉडेलवर जबरदस्त सवलत देत आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना ११,५०० रुपयांहून अधिक बचत करता येणार आहे. किंमत आणि ऑफरचे गणित Apple ने iPhone 16e भारतात ५९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र, सध्या क्रोमाच्या वेबसाइटवर हा फोन सवलतीच्या दरात ५२,३९० रुपयांना उपलब्ध आहे. * फ्लॅट डिस्काउंट: थेट ७,५१० रुपयांची सूट. * बँक ऑफर्स: Axis Bank किंवा ICICI Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास अतिरिक्त ४,००० रुपयांचा फायदा.…
जळगाव/प्रतिनिधी : राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS – National Quality Assurance Standards) अंतर्गत राज्यस्तरीय मूल्यमापनात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी उल्लेखनीय कामगिरी करत गुणवत्ता निकष पूर्ण केले आहेत.त्यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश झाला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा यांच्या NQAS राज्यस्तरीय मूल्यमापनाअंतर्गत एकूण ७१ आरोग्य संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनामध्ये जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आवश्यक गुणवत्ता निकष पूर्ण करून राज्यस्तरीय NQAS प्रमाणनासाठी पात्रता प्राप्त केली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राने 87.98% गुण प्राप्त करून उत्तम कामगिरी केली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुलीपाडा (75.29%) व तळोदा तालुक्यातील सोंरवल बी.के.…
चोपडा :-३१/०१/२०२६ वार शनिवार रोजी किसान विद्या प्रसारक संस्था (KVPS), शिरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या F-Zone क्रीडा स्पर्धेत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा महाविद्यालयाच्या बास्केटबॉल संघाने घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाच्या संघाने जीएमसी पॉलिटेक्निक शहादा या प्रतिस्पर्धी संघावर ६–५ अशा अटीतटीच्या फरकाने मात करत विजेतेपद पटकावले. विजयी संघात गुणवंत सावळे, हर्षल भोई, मयूर सुतार, दीपक बडगुजर, यश अहिरे, द्रोणाचार्य कोळी, मोहित माळी व मयूर भोई या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप…

