पहाटे पासून हातभट्टी, प्रोहिबिशन आणि सट्टा वर संपूर्ण जिल्ह्यात एकच वेळी कारवाही करण्यात आल्या..
जळगाव: जिल्ह्यामध्ये कारवाही चा इम्पॅक्ट व्हावा आणि सर्व सामान्य जनतेला एक आश्वासक वातावरण दिसावे म्हणून सट्टा कारवाही झाल्यानंतर रेड मधील कागद / बॉक्स इत्यादी सार्वजनिक ठिकाणी आणून सर्वांना दिसेल असे जाळण्यात आले….
प्रोहिबिशन, हातभट्टी केसेस मधे ही समाजावर एक दृश्य सकारात्मक परिणाम रहावा म्हणून सर्वांसमोर/ गावासमोर मुद्दाम नाश करण्यात आले …
या सार्वजनिक ठिकाणी जाळण्या/ फेकण्या च्या कारवाही मागची भूमिका:
अशा कृतींमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींवर मानसिक दबाव निर्माण होतो. नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आलेली ही कारवाई समाजात पारदर्शकता आणि प्रशासनावरील विश्वास वाढवते. विशेषतः युवकांमध्ये व्यसन, जुगार आणि अवैध मार्गांविषयी नकारात्मक भावना निर्माण होऊन त्यांना योग्य दिशेने प्रेरणा मिळते. तसेच “अवैध कृत्ये कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत” हा ठोस संदेश समाजात पोहोचतो आणि समाजात कायद्याबद्दल आदर निर्माण होतो ,अवैध व्यवसायांविरोधात जनजागृती होण्यास मदत होते.
अशा सार्वजनिक कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होते, तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायद्याबद्दल आदर आणि सहकार्याची भावना वाढीस लागते. यामुळे सामाजिक शिस्त, नैतिक मूल्ये आणि सुरक्षित वातावरण टिकवून ठेवण्यास मोठी मदत होते.


