अमळनेर | प्रतिनिधी :युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आयोजित मेरा युवा भारत – जळगाव अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा २०२५–२६ नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये डी. आर. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी खो-खो व कबड्डी (मुली) या दोन्ही क्रीडा प्रकारांत विजेतेपद पटकावत दुहेरी यश संपादन केले. या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा बक्षीस वितरण समारंभ पी.बी.ए. इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. आर. कन्या शाळेचे चेअरमन श्री. योगेशदादा मुंदडा होते. बक्षीस वितरण प्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री तथा अमळनेरचे आमदार दादासाहेब अनिलदादा पाटील उपस्थित होते. यावेळी खा. शि. मं. स्वीकृत सदस्या सौ. वंसुधरा…
Author: Chetan Wani
जळगांव: महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद यांच्या वतीने दिला जाणारा तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार श्री. निलेश साहेबराव सोनवणे यांना जाहीर करण्यात आला आहे. शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण व समाजाभिमुख कार्याची दखल तसेच ते अनेक वर्षापासून शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रसार करीत आहे.भारतीय संविधानामधील समता, स्वातंत्र,बंधुता, व न्याय या मूल्यांचे आचरण करून त्यांचे विविध घटकांपर्यंत प्रसार करीत आहे. त्यांचे शैक्षणिक,सामाजिक व समाज प्रबोधन या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.श्री.निलेश साहेबराव सोनवणे हे माध्यमिक विद्यालय धारशेरी, ता.धरणगांव, जिल्हा. जळगांव येथे कार्यरत असून त्यांनी अध्यापनाबरोबरच नवोपक्रमशील शिक्षणपद्धती, मूल्यशिक्षण, वाचनसंवर्धन, स्पर्धा परीक्षा…
जळगाव (राकेश वाणी) – हिंदूंचा इतिहास शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे. हिंदु धर्मावर कितीही आघात झाले, तरी हा चिरंतन धर्म संपुष्टात आला नाही आणि भविष्यातही येणार नाही. याचे कारण जेव्हा रावण जन्माला येतो, तेव्हा रामही जन्माला येतो. जेव्हा कंस जन्म घेतो, तेव्हा कृष्णही अवतार घेतो, जेव्हा औरंगजेब जन्माला येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजही जन्माला येतात. आपल्याला केवळ चांगल्या-वाईटाच्या लढाईत सत्प्रवृत्तींच्या पाठीशी अर्थात धर्माच्या बाजूने उभे रहायचे आहे. जेव्हा हिंदु संघटितपणे धर्महितासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करतील, तेव्हा धर्मविजय हा निश्चित आहे. त्याचप्रमाणे धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करण्यासाठी अर्थात रामराज्याचा दिशेने वाटचाल करण्यासाठी रविवार दि. १ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता मानराज…
अमळनेर (पंकज शेटे):-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना बारामती येथील अंत्ययात्रेच्या दिवशी अमळनेर येथे सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.शेकडो कार्यकर्त्यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे अंत्ययात्रेत दर्शन घेऊन आपल्या लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप दिला.यावेळी अत्यंत भावनाशील वातावरण निर्माण झाले होते. शेकडो कार्यकर्त्यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे घेतले अंत्ययात्रेचे दर्शन बारामती येथील विमान दुर्घटनेनंतर अजितदादा पवार यांची अंत्ययात्रा काल दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता बारामती येथे काढण्यात आली.अमळनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना अखेरचे दर्शन व निरोप देता यावा म्हणून आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांच्यासह शेकडो महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,…
जळगाव, २९ जानेवारी २०२६: भारतातील शेतजमिनीचा ढासळत चाललेला सेंद्रिय कर्ब (Carbon level) आणि ओसाड होत चाललेली जमीन वाचवण्यासाठी देशातील प्रमुख संस्थांनी २०२१ पासून ‘भूमी सुपोषण आणि संरक्षण’ हे राष्ट्रव्यापी जन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत कृषी आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक व धार्मिक संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांतून हजारो गावांमध्ये ‘भूमी पूजन’ कार्यक्रम राबवून जमिनीच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली. यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी आता रसायनमुक्त शेतीकडे वळू लागले आहेत. जमिनीच्या खालावत्या आरोग्याबद्दल शास्त्रज्ञांची चिंता कृषी वैज्ञानिकांनी वारंवार इशारा दिला आहे की, शेतजमिनीचा भौतिक, रासायनिक आणि जैविक समतोल बिघडत चालला आहे. जमिनीतील वाढत्या प्रदूषणामुळे आगामी काळात उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता…
सुभाष धाडे, मुक्ताईनगर: तालुक्यात काल दि 27 रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. संध्याकाळी 5 ते 6 च्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस झाला या पावसात परिपक्क झालेल्या केळी बागा उध्वस्त झाल्या. याचप्रमाणे गहू, मका, हरभरा, टरबूज यासारख्या रब्बी पिकांचेही अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकांचे झालेल्या नुकसानीचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सकाळपासूनच मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट नुकसानग्रस्त शेती गाठत पाहणी करीत प्रशासनास पंचनामे करण्या संदर्भात सूचना दिल्या. मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे, ता कृषी अधिकारी शिंदे यांनी अनेक भागातील शेती शिवारात भेटी देत नुकसानीची पाहणी केली. तालुक्यातील सुकळी, दुई,…
महाराष्ट्र: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. अजित पवारांसह सहा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी समोर आलीय नेमकी घटना काय? अजित पवार हे मुंबईहून एका नियोजित कार्यक्रमासाठी बारामतीला येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरवत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवर वेगाने आदळले. या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात अजित पवार यांचे दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
अमळनेर (पंकज शेटे): शहरातील सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) मुली पळून जाऊन विवाह करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा निर्णयांमुळे मुलींचे भवितव्य आणि कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करत, अमळनेर येथील महिला भगिनींच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन देण्यात आले. प्रभाग क्रमांक 07 च्या नगरसेविका प्रा. योगिता सयाजीराव कापडणेकर यांच्या मार्गदर्शनाने अनेक महिलानी दिले निवेदन या निवेदनात महिलांनी नमूद केले आहे की, जरी कायद्याने सज्ञान मुलीला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला असला, तरी अनेकदा हे निर्णय भावनिक दडपण, फसवणूक किंवा तात्कालिक आकर्षणातून घेतले जातात. याचा परिणाम केवळ त्या मुलीवरच नाही, तर संपूर्ण कुटुंबावर होतो. प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख…
जळगाव : जळगाव शहरातील सुभाष चौकातील नामांकित ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’मध्ये ग्राहकाच्या बहाण्याने येऊन सोन्याची चेन चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. तेलंगणा राज्यातील सायबरबाद परिसरातून या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याने वितळवून बनवलेली सोन्याची लगडदेखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. नेमकी घटना काय? ९ जानेवारी २०२६ रोजी एका अज्ञात व्यक्तीने बाफना ज्वेलर्समध्ये सोने खरेदीचा बहाणा करून प्रवेश केला होता. सेल्समनला बोलण्यात गुंतवून त्याने १९.३५० ग्रॅम वजनाची (किंमत सुमारे २,४९,६१५ रुपये) सोन्याची चेन लंपास केली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असा लागला छडा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे…
जळगाव: महाराष्ट्रातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, अशा ग्रामपंचायतींवर आता ‘प्रशासक’ नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने २३ जानेवारी २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. बातम्यांचे मुख्य मुद्दे: * उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन: मुंबई उच्च न्यायालयाने १४ ऑगस्ट २०२० रोजी जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार ही कार्यवाही केली जात आहे. * प्रशासकीय पोकळी भरून काढणार: ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर किंवा नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्यावर, जोपर्यंत निवडणुका होऊन नवीन बॉडी अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत नियमानुसार प्रशासकाची नियुक्ती केली जाईल. * जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश: राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा…

