Author: Chetan Wani

संस्कृती फाऊंडेशन व जयनिल फाऊंडेशनच्या वतीने होणार सादरीकरण अमळनेर:-शहरात 14 मे रोजी छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीनिमित्त “स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य”चे आयोजन करण्यात आले असुन संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने आणि जयनिल फाऊंडेशनच्या अनमोल सहकार्याने या महानाट्यचे सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे. सामाजिक जाणिव आणि विविध क्षेत्रात असलेल्या उणिवा पूर्ण करण्यासाठी अमळनेरात जयनिल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून १४ मे रोजी छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीनिमित् संस्थेच्या कार्याचा प्रारंभ म्हणून हे महानाट्य आयोजित करण्यात आले असल्याची माहिती युवा उद्योजक तथा आमदार अनिल पाटील आणि माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांचे सुपुत्र गौतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने…

Read More

जळगाव: शहराचे व्यापारी हृदय मानल्या जाणाऱ्या सेंट्रल फुले मार्केट परिसरातील समस्यांनी आता टोक गाठले आहे. अपुरी प्रकाश व्यवस्था, अस्वच्छता, पार्किंगचा अभाव आणि अतिक्रमणामुळे या भागाचा श्वास कोंडला असून, नगरसेवक रमेश मतानी आणि व्यापाऱ्यांच्या वतीने महापौरांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंधाराचे साम्राज्य आणि सुरक्षेचा प्रश्न फुले मार्केट हे सकाळी १० ते उशिरा रात्रीपर्यंत गजबजलेले असते. मात्र, येथील अंतर्गत गल्ल्यांमध्ये पथदिव्यांचा अभाव असून अनेक दिवे बंद अवस्थेत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन चोरी आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणी आणि स्वच्छतेचा…

Read More

भडगाव : (प्रतिनिधी )कृषी उत्पन्न बाजार समितीपाचोरा-भडगावच्या उपबाजारात नवीन रब्बी हंगामातील मका, ज्वारी, हरभरा व गहू या शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. यामुळे भडगाव येथील उपबाजारआवारात व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन विविध अडचणींवर चर्चा केली.बैठकीत शेतमालाची जाहीर लिलाव पद्धतीने खरेदी-विक्री सुरू करण्याचा संयुक्त निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उपबाजारात जाहीर लिलावाचा शुभारंभ करण्यात आला, अशी माहिती बाजार समितीचे सभापतीगणेश पाटील यांनी दिली. उपबाजारात शेतमालाचे लिलाव जलद गतीने पार पाडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा, तसेच उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. चोख वजनमाप व तत्काळ देयकाची सुविधाअसल्याने भडगाव उपबाजारात शेतमालाची आवक वाढत आहे. शेतकऱ्यांनी खाजगी ठिकाणी…

Read More

जळगाव: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाढत्या अनुपस्थितीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रदेशाच्या वतीने जळगाव येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. मराठवाडा व खान्देश स्तरावर अभाविपने केलेल्या शास्त्रशुद्ध सर्वेक्षण अहवालातून उच्च शिक्षण व्यवस्थेत मूलभूत बदलांची गरज चर्चासत्राच्या अध्यक्ष स्थानी असलेले अभाविपचे राष्ट्रीय सहसंगठन मंत्री श्री.देवदत्त जोशी यांनी अधोरेखित केली. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हे चर्चासत्र यशस्वीरित्या पार पडले. या चर्चासत्रास अध्यक्ष स्थानी अभाविपचे राष्ट्रीय सहसंगठन मंत्री श्री.देवदत्त जोशी, प्रदेश मंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.अमोल मराठे, विभाग प्रमुख प्रा. डॉ. राहुल कुळकर्णी,विद्यापीठाचे प्र-कुलगुरू एस.टी इंगळे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे,नितीन झाल्टे, अमोल नाना पाटील, अधिष्ठाता…

Read More

पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव.. जळगाव दि.२६ प्रतिनिधी – रोमांचक आणि थरारक सामन्यांनी जैन ड्रीम स्पेसेस वर रंगलेल्या जळगाव क्रिकेट लिगचा अंतिम सामना अमळनेर सुहांस जायंट्स व जळगाव कोगटा किंग्ज मध्ये झाला. पुर्वेस चौधरीच्या मॅचविनिंग खेळीने जळगाव कोगटा किंग्ज यंदाच्या जेसीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. जळगाव कोगटा किंग्स ने नाणेफेक जिंकून कर्णधार जगदीश झोपे यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अचूक गोलंदाजीच्या जोरावर अमळनेर सुहांस जायटंसच्या फलंदाजांना अंकूश लावला. तत्पूर्वी सलामीचे फलंदाज मानव टिपरेवाल व ऋषी यादव यांनी आक्रमक खेळाला सुरवात केली मात्र ऋषी यादवचा कर्णधार जगदीश झोपेच्या बॉलवर पूर्वेस चौधरीने झेल घेतला एक षटकार एक चौकार…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते शिक्षणाचे एक प्रभावी माध्यम आहे. या महोत्सवांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. बालवयातच उत्तम साहित्याची आणि कलेची आवड निर्माण होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गंमत जंमत बालचित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील उपस्थित होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुलांसाठी मटर पनीर, मंग्या…

Read More

यूनिसेफ, जिल्हा परिषद, कृषी विज्ञान केंद्र आणि जैन इरीगेशन सिस्टीम्स लि. यांचा संयुक्त पुढाकार; ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न जळगाव: – कापूस शेतीमध्ये कार्यरत असलेल्या गर्भवती महिला, स्तनदा माता आणि प्रजननक्षम वयोगटातील महिलांच्या आरोग्य व पोषणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात वात्सल्य प्लस हा सर्वसमावेशक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना शेती कामकाजाच्या दरम्यान उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे, त्यांचे पोषण सुधारणा करणे आणि आरोग्यविषयक योग्य सवयी रुजवणे हे या उपक्रमाचे प्रमुख ध्येय आहे. युनिसेफच्या सहकार्याने महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील कापूस लागवडीचे प्रमुख तालुके एरंडोल, अमळनेर, पारोळा, जामनेर, पाचोरा, चाळीसगांव, धरणगांव, जळगांव…

Read More

जळगाव प्रतिनिधी: जळगाव महानगर अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. दीपक भाऊ सूर्यवंशी व अल्पसंख्यक मोर्चाचे नवनिर्मित जिल्हा महानगर अध्यक्ष मा. परवेज खान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक यशस्वीपणे पार पडली. सत्कार समारंभातील प्रमुख अतिथी व मान्यवर: • मा. जाकीर दादा पठाण (नगरसेवक, ज.म.न.पा) • मा. सुरेश भाऊ सोनवणे (नगरसेवक, ज.म.न.पा) • मा. अतुल भाऊ बारी (नगरसेवक) • मा. वसीम खान (पत्रकार व जिल्हा महानगर उपाध्यक्ष, अल्पसंख्यक मोर्चा) • मा. अफसर मा. अश्फाक खाटिक (माजी अध्यक्ष), शेख, मा. वसीम शेख, मा. शैलेंद्र परदेशी, जब्बार खान (शहर अध्यक्ष, वाहतूक आघाडी, भाजपा), मा. दीपक भाऊ परदेशी, मा. इरफान शेख (मंडळ अध्यक्ष, अल्पसंख्यक…

Read More

जळगाव दि.21 (प्रतिनिधी):  जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 चा रोमांच शिगेला पोहचला आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या दोन सामन्यांत जळगाव कोगटा किंग्स आणि जामनेर सातपुडा हिरोज हा संघ विजयी झाला. त्यापूर्वी सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्स संघाने विजय मिळवला होता. उपांत्यफेरी गाठवण्यासाठी आता जेसीएलच्या सर्व संघामध्ये चुरस निर्माण झाली आहे. मंगळवारी दुपारी जामनेर सातपुडा हिरोज आणि अमळनेर सुहांस जायंट्स या संघामध्ये लढत झाली. जामनेर सातपुडा हिरोज संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाचा हा निर्णय गोलदांजांनी यशस्वी ठरवला. अमळनेर संघाचा पहिला फलंदाज…

Read More

नाशिक: भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व विभागीय प्रसिद्धीप्रमुख यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नाशिकमधून प्रवक्तेपदी अजित चव्हाण आणि लक्ष्मण सावजी यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, गोविंद बोरसे यांची उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुखपदी सलग तिसऱ्यांदा फेरनिवड (हॅट्ट्रिक) झाली आहे. दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव या निवडीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, भारती पवार, जयकुमार रावल आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच नाशिकमधील आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, राहुल ढिकले आणि नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांनी या निवडीचे…

Read More