Author: Chetan Wani

जळगाव दि. १९ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटमध्ये चौकार षटकारांची आतीषबाजी बघायला मिळत आहे. दुसऱ्या सामन्यात जळगाव कोगटा किंगचा ओम भोसले याने धुवांधार शतक ठोकले. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेर्न्सजच्या गोलंदाजींचा समाचार घेत त्याने ५८ चेंडूमध्ये ९ चौकार व ६ षटकार लगावत १०८ धावा करुन एकतर्फी सामना फिरवला. शनिवारी झालेल्या उद्घाटन सामन्यात उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, अशोक जैन यांच्या उपस्थितीत नाणफेक झाली. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेर्न्सजने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जळगाव क्रिकेट लीगमधील सर्वाधिक महाग ठरलेल्या कर्णधार…

Read More

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय.. जळगाव दि. १८ प्रतिनिधी – जळगाव क्रिकेट लिगच्या कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन शनिवारी संध्याकाळी झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, जळगाव महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, संचालक अतुल जैन, धुळ्याचे महापौर मायादेवी परदेशी, बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा बाफना, स्पेक्ट्रमचे दीपक चौधरी उपस्थित होते. यावेळी जळगाव कोगटा किंग्ज संघाचे मालक अतुल कोगटा, जामनेर सातपुडा हिरोजचे किरण बच्छाव, चाळिसगा चॅलेंन्सर्ज संजय भावसार, रावेर रॉयल्स महाविर जैन, विमल जैन, अमळनेर सुहांस जायंट्सचे संदीप काबरा, पाचोरा एसकेटी…

Read More

जळगाव शहरात क्रिकेटचे वारे वाहू लागले असून खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचा उत्साह आता प्रत्यक्ष मैदानावर अनुभवायला मिळणार आहे. स्थानिक खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL) या भव्य स्पर्धेचा थरार १८ ते २६ एप्रिल दरम्यान रंगणार आहे. मेहरूण परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणावर हा क्रिकेटचा महाकुंभ आयोजित करण्यात आला असून, शनिवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी या स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न होईल. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स व अलरीक इलेक्ट्रीकल्स यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर खेळवली जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,…

Read More

जळगाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जळगावात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या गौरवशाली कार्याचे स्मरण करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय सचिव भगवान सोनार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर उत्साही झाला होता. ​याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील योगदानावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विश्वजीत चौधरी यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पत्रकारिता” या विषयावर सविस्तर माहिती दिली. “बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारख्या पत्रांच्या माध्यमातून शोषित…

Read More

चाळीसगाव : तालुक्यातील मेहुणबारे येथे राम मंदिर उभारणीनंतर आता देशाने रामराज्याच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असून, तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केले. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने संत तुकाराम बीज सभा मंडप परिसरात आयोजित धर्मजागर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कच्च्या मालाचे तयार उत्पादनात रूपांतर करून विक्रीची साखळी उभारल्यास ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. तसेच देशाच्या समतोल विकासासाठी ‘जनसंख्या नियंत्रण कायदा’ लागू करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.सभेस १००८ महामंडलेश्वर परमेश्वरा नंदगिरी महाराज (मुंबई), विकास रेंगे…

Read More

अमळनेरमध्ये युवासेनेचा आक्रमक पवित्रा; ८ दिवसांत वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अमळनेर (प्रतिनिधी): येथील श्री शिवाजी हायस्कूल, तांबेपुरा येथील कर्मचाऱ्यांचे मागील ७ महिन्यांपासून वेतन थकीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हक्काच्या पगारासाठी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून, या प्रश्नावर आता युवासेना आक्रमक झाली आहे. येत्या ८ दिवसांत पगार अदा न केल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेचे तालुकाप्रमुख **राहुल भास्कर कंजर** यांनी प्रशासनाला दिला आहे. **प्रशासकीय उदासीनतेचा फटका** मिळालेल्या माहितीनुसार, श्री शिवाजी हायस्कूलमधील कर्मचारी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. मात्र, ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या काळातील वेतन अद्यापही प्रलंबित आहे. विशेष म्हणजे,…

Read More

जळगाव : जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा नियोजन सभागृह ,जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव येथे जिल्ह्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते तसेच अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी पोलिस पाटील यांना त्यांच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी महसूल प्रशासनातील पोलिस पाटील यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी पोलिस प्रशासनातील जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या. जिल्हा आपत्ती…

Read More

चाळीसगाव: आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने चाळीसगाव तालुक्यात एका भव्य ‘धर्मसभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या सभेला श्री राम जन्मभूमी आंदोलनाचे जनक आणि हिंदू जनमानसातील प्रमुख नेतृत्व डॉ. प्रवीणभाई तोगडिया हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचा सविस्तर तपशील: * प्रमुख वक्ते: डॉ. प्रवीणभाई तोगडिया (संस्थापक, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद) * दिनांक: बुधवार, ८ एप्रिल २०२६ * वेळ: सायंकाळी ४:०० वाजता * स्थळ: राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर, जामदा फाटा, मेहुणबारे, ता. चाळीसगाव. आयोजक: ही धर्मसभा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल, चाळीसगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या सभेला तालुक्यातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,…

Read More

जळगाव, दि.४ – जळगाव जिल्ह्यातील नामांकित‎ गुरुनानक ऑप्टिकलचा ३० वर्षाचा‎ प्रदीर्घ अनुभव आता नव्याने अत्याधुनिक दालन‎ ‘ऐनक‎ प्लस’च्या रूपाने ‎ अत्याधुनिक सेवेसह‎ जळगावकरांच्या सेवेत येणार आहे. रिंग रोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये उद्या दि.५‎ एप्रिल‎ रोजी ‎‘ऐनक‎ प्लस’चा शुभारंभ होत आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत ३० वर्षापासून होलसेलर म्हणून असलेल्या गुरुनानक ऑप्टिकलचे नवीन भव्य आणि अत्याधुनिक दालन ‘ऐनक‎ प्लस’ हे जळगावकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. नवीन शोरूममध्ये अत्याधुनिक नवीन टेक्नॉलॉजीच्या ‎मशीनने ग्राहकांसाठी ‎मोफत‎ नेत्र तपासणीची सोय‎ देखील उपलब्ध आहे.‎ *ब्रँडेड फ्रेम्स,‎ गॉगल्स, लेन्सेस उपलब्ध* ‘ऐनक‎ प्लस’मध्ये रेबैन, ओकले, जग्वार, वॉग, फ़ास्ट ट्रॅक, वुल्फ आईज, पोलोराईड, इंसिस्ट, फेदर यासारख्या नामांकित कंपनीचे फ्रेम्स,‎…

Read More

भडगांव (प्रतिनिधी) :भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्यातील भडगाव मंडलाची आज कार्यकारणी जाहीर करण्यात आली, भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्यातील भडगाव मंडलाची कार्यकारणी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशाने, ना. गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेनुसार, मंडल अध्यक्ष विनोद नेरकर यांनी भडगाव भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष पदी देवराम निंबा महाजन यांची निवड जाहीर केली. देवराम महाजन यांचे भडगाव तालुक्यातील ओबीसी, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील बांधवांचे संघटन असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे देवराम (आबा) महाजन यांनी भडगांव तालुका…

Read More