Author: Chetan Wani

प्रतिनिधी – जळगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत 23 मार्च रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयावर काढण्यात येणाऱ्या संयुक्त मोर्चाबाबत आक्रमक भूमिका जाहीर करण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चाला “निर्णायक लढा” असे संबोधत, राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागपूरकडे कूच करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. बैठकीदरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल करत, देशहिताशी संबंधित प्रश्नांवर तीव्र भूमिका मांडली. तसेच या सर्व मुद्द्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. “हा फक्त मोर्चा नाही, तर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्णायक एल्गार आहे,” असा ठाम संदेश बैठकीतून…

Read More

जळगाव: स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित “चैत्र पालवी स्वरोत्सव” मैफल गुढी पाडव्याला महात्मा गांधी उद्यानात उत्साहात संपन्न झाली. भक्ती गीते, अभंग, नाट्यगीत व सुगम सांगितले नटलेली ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. कार्यक्रमाची सुरवात प्रतिष्ठानच्या परंपरे नुसार गुरु वंदनेने झाली. गुरु वंदना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सदर केली. दीप प्रज्वलन जळगाव नगरीच्या प्रथम नागरिक व महापौर सौ. दीपमाला काळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, आमदार श्री. राजूमामा भोळे व दीपक चांदोरकर यांच्या हस्ते झाली. आणि सुरू झाला एक सुरेल मंगलमय गीतांचा प्रवास. श्री. वरूण नेवे, सौ. श्रुती जोशी व बासरी वर राजेश्वरी रत्नपारखी यांनी गीते सादर केली.…

Read More

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील भुसावळ शहरातील चित्रकार रमाकांत भालेराव यांचे वारली चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव येथील पु.ना. गाडगीळ अँड सन्स येथील कला दालनामध्ये सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न झाले . या प्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांचे हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध रंगकर्मी शंभू पाटील, भारत विकास परिषदेचे देवगिरी प्रांताचे संपर्क सचिव योगेश मांडे त्याचप्रमाणे कोठारी क्लासेसचे बिपिन शाह व पी.एन. गाडगीळ अँड सन्सचे व्यवस्थापक गिरीश डेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, लोक चित्रकला आणि चित्रकला…

Read More

आमदार किशोर पाटील यांचा महावितरणला दणका; ८ तास वीज देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे भडगाव | प्रतिनिधी : तालुक्यातील वडजी ३३/११ केव्ही सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी सबस्टेशनवर जोरदार ‘ठिय्या आंदोलन’ केले. सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनानंतर महावितरणने तांत्रिक अडचणी सोडवून पूर्ववत ८ तास वीज देण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. ठेकेदाराच्या दिरंगाईचा फटका भडगाव तालुक्यातील इतर गावांना दिवसा वीज मिळत असताना, केवळ वडजी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांना ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. कोठली १३२ केव्ही सबस्टेशनवरून स्वतंत्र वीज वाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर…

Read More

जळगाव- (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज (दि. 14 मार्च 2026) सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. तहसील कार्यालय एरंडोल येथे कार्यरत असलेले दिवंगत महसूल सहाय्यक कै. शिवाजी महाजन यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर जिल्हाभरातील महसूल कर्मचारी बांधवांनी एकत्रितपणे मदत निधी जमा केला होता. या निधीतून ₹2,64,000 (रुपये दोन लाख चौसष्ट हजार) इतकी मदत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते दिवंगत महाजन यांच्या कुटुंबीयांना प्रदान करण्यात आली. यानंतर जळगाव शहरातील कन्या छात्रालयातील एकूण 42 विद्यार्थिनींना शालेय दप्तर, वह्या, कंपास साहित्य व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम महसूल कर्मचारी संघटना,…

Read More

जळगाव: भडगाव तालुक्यातील मौजे पिंप्री हाट येथील सौ. लताबाई मांगो पगारे या मागासवर्गीय महिलेवर गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. या घटनेत संबंधित महिलेचा विनयभंग देखील करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी जळगाव (पश्चिम) तर्फे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. आज दिनांक १३ मार्च २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. नेमकी घटना काय? पिंप्री हाट येथे राहणाऱ्या सौ. लताबाई पगारे यांच्या घरात शिरून काही…

Read More

अमळनेर ( प्रतिनिधी ) : सार्वजनिक श्रीराम नवमी उत्सव समितीची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत यंदाच्या श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार असून आदिवासी नृत्य सादरीकरण, लहान मुलांचे कला-कौशल्याचे कार्यक्रम तसेच वारकरी संप्रदायातील टाळ-मृदंगाच्या गजरात भजन-कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाची श्रीराम नवमी मिरवणूक अधिक आकर्षक आणि उत्साहपूर्ण होणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. दरम्यान, दि. 26 मार्च 2026, गुरुवार रोजी होणाऱ्या या भव्य मिरवणुकीत सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवावी, असे आवाहन सार्वजनिक श्रीराम नवमी उत्सव…

Read More

भडगाव (प्रतिनिधी): सध्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ही वाढ लक्षात घेता सर्वाइकल कॅन्सर ह्या आजारावर आळा बसावा म्हणून आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही ह्या लसीची निर्मिती करण्यात आली आहे. ८मार्च रोजी जागतिक महिला दिनी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे प्रथम लाभार्थी दिक्षा तांबटकर हिला लस देऊन शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी आमदार किशोरआप्पा पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे ह्या होत्या. कार्यक्रमास नगरसेवक सचिनकुमार चोरडिया, वैशालीताई विशाल पाटील, इमरान सय्यद, राहुल ठाकरे, अतुलसिंह परदेशी, सामाजिक कार्यकर्ते जहांगीर मालचे हे उपस्थित होते. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज जाधव, भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ, स्त्री…

Read More

जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तत्पर तक्रार निवारणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्राच्या’ नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज, दिनांक ०८/०३/२०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सदर इमारतीचे भूमिपूजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. 📍 कार्यक्रमाचे स्वरूप व उपस्थिती कार्यक्रमाची सुरुवात पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये त्यांनी या केंद्राच्या उभारणीचा उद्देश स्पष्ट केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांनी…

Read More

जळगाव : पणन महासंघाचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक रोहित दिलीप निकम यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिकतर्फे राज्यस्तरीय ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४-२५’ प्रदान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योजक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार सामाजिक कृतज्ञतेसाठी दिला जातो. नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात ७ मार्च रोजी शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात रोहित निकम यांचे बंधू व न्यू सॉफ्टएड कॉम्प्युटरचे संचालक रितेश निकम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी मंचावर निवृत्त न्यायमूर्ती वसंतराव पाटील, महापौर हिमगौरी आडके-आहिर, शहीद मिलिंद खैरनार यांच्या पत्नी हर्षदा खैरनार, हेमंत धात्रक, संतोष…

Read More