६७८ वाहनांवर कारवाई; ५९ गुन्हे दाखल करत जिल्हा प्रशासनाचा वाळू माफियांना इशारा जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसूल विभागाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल ६७८ वाहने अडकली असून, त्यांच्यावर १० कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कारवाईचा लेखाजोखा (१ एप्रिल २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६): जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गेल्या ११ महिन्यांत झालेली कारवाई खालीलप्रमाणे आहे: * कारवाई झालेली वाहने: ६७८ * एकूण आकारलेला दंड: १०,००,२६,७७८ रुपये (१० कोटी+) * वसूल करण्यात आलेली रक्कम: ६,९९,७१,२५० रुपये * दाखल झालेले…
Author: Chetan Wani
जळगाव, धुळे, नंदुरबारसह राज्यातील योग शिक्षक एकवटले! जळगाव प्रतिनिधी | शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने जळगाव शहरातील मायावती नगर येथील रोटरी भवनमध्ये शनिवारी (२८ फेब्रुवारी) एकदिवसीय राज्यस्तरीय योग शिक्षक संमेलनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या संमेलनात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमधून ३०० हून अधिक योग शिक्षक व साधकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता दीपप्रज्वलनाने व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. व्यासपीठावर सारस्वत अतिथी म्हणून डॉ. राजेश जैन, प्रमुख अतिथी प्रसाद कुलकर्णी, संस्थापक सदस्य कृणाल महाजन, योगशिक्षक समितीचे सदस्य डॉ. देवानंद सोनार, महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे विभाग प्रमुख सुनील गुरव आणि…
जळगाव | प्रतिनिधी : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या ‘विज्ञान ज्योती’ प्रकल्पांतर्गत पी. एम. श्री. केंद्रीय विद्यालय (भुसावळ), पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय (शेगाव) आणि पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय (भुसावळ) येथील ४८ विद्यार्थ्यांनी २७ फेब्रुवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शैक्षणिक अभ्यास दौरा केला. या दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान आणि प्रत्यक्ष संशोधनाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळाली. कुलगुरूंनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद विद्यापीठात आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची भेट घेतली. यावेळी कुलगुरू व कुलसचिवांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विज्ञान शिक्षणाचे महत्त्व, संशोधनातील…
जळगाव, दि.२८ – शहरातील शनिपेठ परिसरात भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची अखेर दखल घेण्यात आली. नागरिकांनी सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतर स्थानिक नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी तत्काळ पुढाकार घेत मनपा प्रशासनाशी थेट संपर्क साधला. तक्रारीची दखल घेत शनिवारीच अतिक्रमण विभागाने कारवाई करत शनिपेठेतील दोन्ही गल्ल्यांमधील अतिक्रमण हटवले. जळगाव शहरातील शनिपेठ परिसरात बळीराम मंदिर आणि शनिमंदिर समोरील गल्लीत दररोज भाजीपाला विक्रेते रस्त्यावर लोटगाडी लावून किंवा रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करतात. भाजीपाला विक्रेत्यांमुळे जवळपास ७० टक्के रस्ता ब्लॉक होतो आणि वाहनचालकांना ये-जा करण्यास रस्ता राहत नाही. शनिवारी तर कहरच असतो, काही मुजोर विक्रेते अरेरावी देखील करतात. याबाबत आज नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून…
जळगाव : संसदेच्या कायद्याने स्थापित ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या (ICAI) जळगाव शाखेने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. वर्ष २०२५ मध्ये राबविलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत, पश्चिम भारत क्षेत्रीय परिषद (WIRC) स्तरावर जळगाव शाखेला ‘सर्वोत्कृष्ट शाखा’ म्हणून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईत दिमाखदार सोहळा मुंबई येथे पार पडलेल्या ७६ व्या भव्य वार्षिक सोहळ्यात, पश्चिम भारत क्षेत्रीय मंडळाचे अध्यक्ष सी.ए. केतन सैया यांच्या हस्ते हा बहुमान प्रदान करण्यात आला. जळगाव शाखेचे अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल, उपाध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल आणि सेक्रेटरी सी.ए. सोहन नेहेते यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतील शाखांच्या…
राष्ट्रीय जनमंच आक्रमक; तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना इशारा चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव शहर आणि तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बऱ्या वाजला असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही. सोनसाखळी चोरी, वकिलांवरील हल्ले आणि महिला पोलिसांना होणारी मारहाण यांसारख्या गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीने आज चाळीसगाव तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक (जळगाव) यांना कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले. कायद्याचे राज्य की गुंडांचे? निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या तीन-चार महिन्यांपासून शहरात लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. करगाव रोड आणि वामन नगर परिसरात महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या घटनांनी महिला वर्गात भीती पसरली आहे.…
अमळनेर (पंकज शेटे): अमळनेर नगरपरिषदेच्या सन २०२६–२७ या आर्थिक वर्षाच्या ३८३.८३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास आज विशेष सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत कोणत्याही प्रकारची नवीन कर वाढ न करता शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये आणि तरतुदी: या अर्थसंकल्पात केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून, शहराच्या उज्ज्वल भविष्याची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने खालील बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे: * पायाभूत सुविधा: शहरांमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि पाणीपुरवठा यंत्रणेचे आधुनिकीकरण. * आरोग्य आणि स्वच्छता: सार्वजनिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य सुविधा. * शहर…
जळगाव: बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा (BCMG) २०२६ च्या आगामी निवडणुकीसाठी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲड. रेखा घन:श्याम कोचुरे यांनी आज, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे दाखल केला. त्यांच्या या निर्णयामुळे जळगावसह खान्देशातील विधी क्षेत्रात नवी ऊर्जा संचारली आहे. ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि ‘हक्काचं व्यक्तिमत्व’ गेल्या ३ दशकांपासून वकिली व्यवसायात कार्यरत असलेल्या ॲड. रेखा कोचुरे यांची ओळख एक संयमी, अभ्यासू आणि मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून आहे. जात-पात, लिंगभेद आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक सहकाऱ्याला मदत करण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांची मोठी ताकद मानली जाते. आजवर कोणत्याही वादात न…
शिरसोली (जळगाव):शिवजयंतीचे औचित्य साधून आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायत येथे भव्य ‘महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शिरसोली परिसर आणि जळगाव शहर परिसरातील एकूण ९५७ लाभार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा करण्यात आली. प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन हे शिबिर पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील, त्यांचे सुपुत्र माजी जि.प. सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, विक्रम गुलाबरावजी पाटील, शिवसैनिक शिवदास उत्तम बारी आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र गवळी यांच्या विशेष प्रयत्नातून पार पडले. याकामी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नागनाथ गंगासागरे व प्रशासकीय…
प्रतिनिधी -भडगाव: येथे वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यशवंतनगर पासुन ते पारोळा चौफुली पर्यंत सजविलेल्या ट्रॅक्टरवरुन विर एकलव्या यांच्या मुर्तीची मिरवणुक वाजत गाजत काढण्यात आली. तर पारोळा चौफुली चौकात वीर एकलव्य यांच्या मुर्तीचे पुजन नागरीक, समाज बांधवांनी केले. यावेळी शिवसेना गटनेते लखीचंद पाटील, अशोक परदेशी, विक्रम सोनवणे, हेमंत पाटील, दिनेश महाजन, भगवान शिंदे, किस्मत पहीलवान, देविदास राठोड, चुडामण सोनवणे, भावडु मोरे, अल्ताफ शेख, योगीराज पाटील, निलेश सोनवणे यांचेसह नागरीकांची उपस्थिती होती. या जयंतीचे नेतृत्व एकलव्य संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रवी सोनवणे, तालुका अध्यक्ष किरण मोरे, शहराध्यक्ष विनोद मोरे, मिथुन गायकवाड, नाना मालचे, हिरामण सोनवणे, जयंती अध्यक्ष भैया गांगुर्डे,…

