टीम डिजीटल पीढी । चेतन वाणी । शहरातील संगीतप्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरणारा ‘भजन जॅमिंग’ कार्यक्रम येत्या ५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात लोकप्रिय ‘बॅकस्टेज सिब्लिंग्स’ हे गट सादरीकरण करणार असून भक्तिमय वातावरणात संगीताची अनोखी मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
हा कार्यक्रम अदित्या फार्म्स येथे पार पडणार असून, पारंपरिक भजनांसोबत आधुनिक जॅमिंगची सांगड घालत एक वेगळा संगीत अनुभव देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. कार्यक्रमादरम्यान ‘महा गंगा आरती’ देखील आयोजित करण्यात आली असून त्यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन स्टेज क्राफ्ट एक्स्पिरियन्सेस यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी स्टेज क्राफ्टचे सूरज झंवर, यश मंत्री, अनय दमानी, अमीर आहुजा यांच्यासह विविध संस्था व भागीदारांच्या मदतीने हा कार्यक्रम साकारला जात आहे.
रसिकांनी या कार्यक्रमासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असून, पोस्टरवरील QR कोड स्कॅन करून तिकीट आरक्षित करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी ९६७३५०७८८८ / ८६००१९९९९५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
भक्ती आणि संगीताचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


