Author: Chetan Wani

जळगाव: खानदेशची संस्कृती, परंपरा आणि अस्सल चवींचा वारसा जपणारा ‘बहिणाबाई महोत्सव’ यंदा आपल्या ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे. भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव २३ ते २७ जानेवारी दरम्यान जळगाव शहरात रंगणार असून, यंदाची ‘पंच परिवर्तन’ ही संकल्पना महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्याला भरारी फाउंडेशनचे संस्थापक दीपक परदेशी, विनोद ढगे, क्रेडाईचे अध्यक्ष दीपक सराफ, तुषार महाजन, राजेश खडके आणि पुष्कर नेहते यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जीवन गौरव पुरस्काराची घोषणा समाजासाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल यंदा महोत्सवात विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला…

Read More

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात अद्याप ‘ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर’ (AVTS) कार्यान्वित न झाल्यामुळे स्थानिक वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना (RTO) निवेदन देऊन फिटनेस चाचणीची जुनी पद्धत तात्पुरती सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. *२५० किलोमीटरचा प्रवास आणि आर्थिक भुर्दंड* निवेदनात नमूद केल्यानुसार, जळगाव जिल्ह्यात फिटनेस सेंटर नसल्यामुळे वाहनधारकांना फिटनेस चाचणीसाठी नाशिक (२५० किमी) किंवा छत्रपती संभाजीनगर (१५० किमी) येथे जावे लागत आहे. लांबच्या प्रवासामुळे इंधन खर्च, टोल, वाहनांची झीज आणि दोन ते तीन दिवसांचा रोजगार बुडत असल्याने वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान…

Read More

भडगाव -प्रतिनिधी : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा विषय समितीच्या निवडणूक नियम १९६६ मधील नियम ३ नुसार भडगाव नगरपरिषदेची विशेष सभा दि. २० जानेवारी रोजी नगरपरिषद सभागृहात पार पडली.या सभेत नगरपरिसदेच्या विविध विषय समित्यांची स्थापना करण्यात आली. ही सभा पिठासिन अधिकारी तथा भडगाव तहसीलदार शितल सोलाट व प्रभारी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या उपस्थितीत पार पडली. भडगाव नगरपरिषदेत आज झालेल्या विषय समित्यांची निवड रितसर प्रक्रिया पार पाडून बिनविरोध झाली. या समित्यांमध्ये स्थायी समिती सदस्य -लखीचंद प्रकाश पाटील,सार्वजनिक बांधकाम समिती सभापती – फकीर नगमाबी अलीमशाह,सदस्य- विजयकुमार रायभान भोसले,देवाजी आहीरे,युवराज पाटील,जितेंद्र पाटील ,शिक्षण समिती सभापती -अतुल परदेशी,सदस्य…

Read More

अमळनेर |पंकज शेटे : सोमवारी अमळनेर नगर परिषदेच्या सभागृहात विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया शांततेत व निर्विरोध पार पडली. नगर परिषदेतील विविध समित्यांवर सभापतीपदासाठी झालेल्या निवडीत सर्व पदांवर एकमताने निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक साहेबराव वसंत पवार यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी कैलास नामदेव पाटील, तर आरोग्य समितीच्या सभापतीपदी रामकृष्ण बापूराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी शेख नविद अहमद मुशिरोद्दीन, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी स्वाती सुरजसिंह परदेशी यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच योजना व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष प्रशांत मनोहर निकम यांची…

Read More

जळगाव, दि.१८ – जळगाव शहर महानगर पालिका निवडणुकीत महायुतीचा डंका वाजला असून महापौर महायुतीचा होणार आहे. गट स्थापन केल्यानंतर याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणुकीत जनतेने माझ्याबाजूने, विकासाला कौल दिला आहे. मतदानाच्या दिवशी जो प्रकार घडला आणि माझ्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी दिली आहे. प्रभाग ५ मधून विजयी झाल्यानंतर नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विष्णू भंगाळे म्हणाले की, जळगावात महायुती म्हणून आम्ही लढलो आणि आम्हाला भरपूर यश मिळाले. जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. आम्ही आमचे नेते गुलाबराव…

Read More

प्रतिनिधी : हुशारी ही केवळ गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रांवरूनच ठरते का ? असा प्रश्न उपस्थित करत व्याख्याते शैलेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. आज प्रमाणपत्रासाठी शिक्षण घ्यावे, असा अट्टाहास केला जातो. मात्र केवळ प्रमाणपत्रासाठी शिक्षण नको, तर आयुष्यभर चालणारे आपले शिकणे प्रमाणित करता आले पाहिजे. सध्या शिक्षित व अशिक्षित यांच्यातील फरक जाणवत नाही. अनेकदा शिकलेले लोकही अडाणीपणाने वागतात, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे दि. १७ रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेज, भालोद, ता. यावल येथे माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे प्रथम…

Read More

चाळीसगाव (प्रतिनिधी) : आज दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता अंतोदय जनसेवा कार्यालय, आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या कार्यालयात *महाराष्ट्र राज्याच्या संत सेवालाल तांडा समृद्धी योजनेचे राज्यस्तरीय समिती समन्वयक तसेच हिंद की चादर समितीचे सदस्य व* *सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भिकन जाधव साहेब यांचा* चाळीसगाव तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने भव्य गौरव व सत्कार करण्यात आला. संत सेवालाल तांडा समृद्धी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भिकन जाधव साहेब यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी बंजारा तांड्यांना महसूल गावाचा दर्जा देणे तसेच नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तांड्यांच्या मूलभूत सुविधा,प्रशासनिक…

Read More

जळगाव: निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी, प्रभाग क्रमांक ५ मधील सर्व बोगस आणि दुबार नोंदणी असलेल्या मतदारांवर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उमेदवार ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. *नेमके प्रकरण काय?* नुकतीच निवडणूक मतदार यादी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ५ मध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे समोर आले होते. या यादीत अनेक मतदारांची नावे दोन वेळा असणे, प्रभागात राहत नसतानाही नावे नोंदवणे आणि संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी करणे असे प्रकार उघडकीस आले होते. ॲड. पियूष पाटील यांचा आक्रमक पवित्रा…

Read More

जळगाव: प्रभाग ५ च्या रणसंग्रामात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात अपक्ष उमेदवार पियूष नरेंद्र पाटील यांनी काढलेल्या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. ही केवळ रॅली नसून एक अभूतपूर्व ‘जनसागर’ असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे आणि पियूष पाटील यांच्यातील ही लढत आता खऱ्या अर्थाने ‘काटे की टक्कर’ ठरत असून, प्रत्यक्ष मैदानात मात्र जनमत पियूष पाटील यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. ऐतिहासिक रॅली आणि अफाट जनसागर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पियूष पाटील यांनी आपल्या ‘कपबशी’ या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी काढलेल्या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. रॅलीच्या मार्गावर जिथे पाहावे तिथे केवळ डोकीच दिसत होती. या अफाट जनसमुदायाने विरोधकांच्या…

Read More

जळगाव: जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज थांबली. प्रभाग क्र. २ (ब) मधील अपक्ष उमेदवार सौ. सोनवणे शुभांगी अक्षय यांच्या प्रचाराने आज कळस गाठला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढलेल्या रॅलीमध्ये महिला आणि युवकांचा अलोट प्रतिसाद पाहता, विरोधकांच्या गोटात चांगलीच धास्ती निर्माण झाली असल्याचे चित्र दिसत आहे. महिला व युवकांचा ‘बॅट’ला वाढता पाठिंबा सकाळपासूनच प्रभागात शुभांगी सोनवणे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. विशेषतः महिला बचत गटातील महिलांनी आणि स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनी ‘बॅट’ हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी कंबर कसली आहे. “आपला प्रभाग, आपला विकास” आणि “परिवर्तनासाठी एक मत” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. वचननाम्यातील प्रमुख मुद्दे ठरतायत आकर्षणाचे केंद्र शुभांगी…

Read More