Author: Chetan Wani

अमळनेर (पंकज शेटे):-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना बारामती येथील अंत्ययात्रेच्या दिवशी अमळनेर येथे सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली.शेकडो कार्यकर्त्यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे अंत्ययात्रेत दर्शन घेऊन आपल्या लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप दिला.यावेळी अत्यंत भावनाशील वातावरण निर्माण झाले होते.  शेकडो कार्यकर्त्यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे घेतले अंत्ययात्रेचे दर्शन बारामती येथील विमान दुर्घटनेनंतर अजितदादा पवार यांची अंत्ययात्रा काल दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता बारामती येथे काढण्यात आली.अमळनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना अखेरचे दर्शन व निरोप देता यावा म्हणून आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील यांच्यासह शेकडो महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,…

Read More

जळगाव, २९ जानेवारी २०२६: भारतातील शेतजमिनीचा ढासळत चाललेला सेंद्रिय कर्ब (Carbon level) आणि ओसाड होत चाललेली जमीन वाचवण्यासाठी देशातील प्रमुख संस्थांनी २०२१ पासून ‘भूमी सुपोषण आणि संरक्षण’ हे राष्ट्रव्यापी जन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत कृषी आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक व धार्मिक संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांतून हजारो गावांमध्ये ‘भूमी पूजन’ कार्यक्रम राबवून जमिनीच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली. यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी आता रसायनमुक्त शेतीकडे वळू लागले आहेत. जमिनीच्या खालावत्या आरोग्याबद्दल शास्त्रज्ञांची चिंता कृषी वैज्ञानिकांनी वारंवार इशारा दिला आहे की, शेतजमिनीचा भौतिक, रासायनिक आणि जैविक समतोल बिघडत चालला आहे. जमिनीतील वाढत्या प्रदूषणामुळे आगामी काळात उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता…

Read More

सुभाष धाडे, मुक्ताईनगर: तालुक्यात काल दि 27 रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. संध्याकाळी 5 ते 6 च्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस झाला या पावसात परिपक्क झालेल्या केळी बागा उध्वस्त झाल्या. याचप्रमाणे गहू, मका, हरभरा, टरबूज यासारख्या रब्बी पिकांचेही अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकांचे झालेल्या नुकसानीचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सकाळपासूनच मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट नुकसानग्रस्त शेती गाठत पाहणी करीत प्रशासनास पंचनामे करण्या संदर्भात सूचना दिल्या. मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे, ता कृषी अधिकारी शिंदे यांनी अनेक भागातील शेती शिवारात भेटी देत नुकसानीची पाहणी केली. तालुक्यातील सुकळी, दुई,…

Read More

महाराष्ट्र: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. अजित पवारांसह सहा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी समोर आलीय नेमकी घटना काय? अजित पवार हे मुंबईहून एका नियोजित कार्यक्रमासाठी बारामतीला येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरवत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवर वेगाने आदळले. या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात अजित पवार यांचे दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Read More

अमळनेर (पंकज शेटे): शहरातील सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) मुली पळून जाऊन विवाह करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा निर्णयांमुळे मुलींचे भवितव्य आणि कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करत, अमळनेर येथील महिला भगिनींच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन देण्यात आले. प्रभाग क्रमांक 07 च्या नगरसेविका प्रा. योगिता सयाजीराव कापडणेकर यांच्या मार्गदर्शनाने अनेक महिलानी दिले निवेदन या निवेदनात महिलांनी नमूद केले आहे की, जरी कायद्याने सज्ञान मुलीला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला असला, तरी अनेकदा हे निर्णय भावनिक दडपण, फसवणूक किंवा तात्कालिक आकर्षणातून घेतले जातात. याचा परिणाम केवळ त्या मुलीवरच नाही, तर संपूर्ण कुटुंबावर होतो. प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख…

Read More

जळगाव : जळगाव शहरातील सुभाष चौकातील नामांकित ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’मध्ये ग्राहकाच्या बहाण्याने येऊन सोन्याची चेन चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. तेलंगणा राज्यातील सायबरबाद परिसरातून या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याने वितळवून बनवलेली सोन्याची लगडदेखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. नेमकी घटना काय? ९ जानेवारी २०२६ रोजी एका अज्ञात व्यक्तीने बाफना ज्वेलर्समध्ये सोने खरेदीचा बहाणा करून प्रवेश केला होता. सेल्समनला बोलण्यात गुंतवून त्याने १९.३५० ग्रॅम वजनाची (किंमत सुमारे २,४९,६१५ रुपये) सोन्याची चेन लंपास केली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असा लागला छडा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे…

Read More

जळगाव: महाराष्ट्रातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, अशा ग्रामपंचायतींवर आता ‘प्रशासक’ नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने २३ जानेवारी २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. बातम्यांचे मुख्य मुद्दे: * उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन: मुंबई उच्च न्यायालयाने १४ ऑगस्ट २०२० रोजी जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार ही कार्यवाही केली जात आहे. * प्रशासकीय पोकळी भरून काढणार: ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर किंवा नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्यावर, जोपर्यंत निवडणुका होऊन नवीन बॉडी अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत नियमानुसार प्रशासकाची नियुक्ती केली जाईल. * जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश: राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा…

Read More

पारोळा: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीने आपली कंबर कसली आहे. गेल्या चार दिवसांपासून पक्षाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांचा आढावा घेण्याचे सत्र सुरू असून, आज पारोळा येथे तालुका कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. स्वबळाचा नारा आणि रणनीती बैठकीला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील (लाला सर) यांनी स्पष्ट केले की, वंचित बहुजन आघाडी जळगाव लोकसभेतील सर्व ६८ पंचायत समिती आणि ३४ जिल्हा परिषद गटांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. विशेषतः अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) साठी राखीव असलेल्या जागांवर पक्षाची पूर्ण ताकद लावण्यात येणार आहे. प्रमुख उपस्थितांची मांदियाळी या आढावा…

Read More

भडगाव -प्रतिनिधी : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. स्वागतगीत कु. लावण्या महाजन हिने म्हटले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अजय अहिरे तर प्रमुख अतिथी पोलिस निरीक्षक महेश शर्मा, कवी प्रा. खुशाल कांबळे, उपमुख्याध्यापिका छाया बिऱ्हाडे, पर्यवेक्षक शरद महाजन, अशोक तायडे, उपप्राचार्य संदीप सोनवणे उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. शरद पाटील यांनी करुन दिला. प्रास्ताविक संदीप सोनवणे यांनी केले. यावेळी कॉपीमुक्त अभियान, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत परीक्षा, शिक्षासूची, विविध सुचना याविषयी माहिती दिली, शालेय गुणवत्तेची परंपरा सांगितली. महेश शर्मा पोलिस निरीक्षक यांनी ध्येय…

Read More

भडगाव-प्रतिनिधी : तालुक्यातील तांदुळवाडी गावातील पाच तरुणांची देशसेवेसाठी विविध संरक्षण दलांमध्ये निवड झाली आहे. यामुळे गावात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने निवड झालेल्या जवानांची मिरवणुक काढण्यात आली. निवड झालेल्या जवानांमध्ये अनुज भैयासाहेब महाजन (सीआरपीएफ), नाना पवार (सीआयएसएफ ), अनुराग सुधीर पाटील (बीएसएफ), गौरवअनिल पाटील (बीएसएफ) व अनंत तुकाराम मोरे (इंडीयन नेव्ही) यांचा समावेश आहे. या प्रसंगी अशोक परदेशी, प्रा. प्रशांत पाटील यांनी जवानांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. या तरुणांनी केलेली मेहनत व देशप्रेम इतर युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. ग्रामस्थांनी “जय हिंद “च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत या जवानांना खूप शुभेच्छा…

Read More