नाशिक: कर्नाटकच्या चोरली घाटात ४०० कोटी रुपयांची रोख रक्कम असलेला कंटेनर चोरीला गेल्याच्या संशयातून नाशिकच्या एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आता विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. नेमकी घटना काय? इगतपुरी येथील रहिवासी संदीप पाटील यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, मुंबई-ठाणे परिसरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचे ४०० कोटी रुपये असलेला कंटेनर चोरीला गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या संशयातून त्यांचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. तिथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. पाच…
Author: Chetan Wani
अमळनेर ः येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे श्री गणेश जयंती व वसंत पंचमीनिमित्त गुरुवार, दि. 22 जानेवारी रोजी सकाळी श्री विद्याविनायक यागास प्रारंभ झाला होता. शुक्रवार, दि. 23 जानेवारी रोजी दुपारी दोनला द्रौ. रा. कन्या शाळेच्या नऊ विद्यार्थिनींच्या हस्ते श्री विद्याविनायक यागाची पूर्णाहूतीने सांगता झाली. वसंत पंचमीनिमित्त श्री मंगळग्रह देवतेचा केशर जलाद्वारे अभिषेक करण्यात आला. सुरुवातीला स्थापित देवतांची प्रातःपूजा करण्यात आली. श्री गणेश व सरस्वती मातेचे ब्रह्मनस्पती सुक्त व मेधा सुक्त या यजुर्वेदीय सुक्तांनी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सरस्वती मातेला पांढऱ्या पुष्पाने अर्चन करण्यात आले. त्यानंतर 1 हजार मंत्रांनी सरस्वती मातेस हवन कन्यांच्या माध्यमातून करण्यात आले. या कर्माची सांगतेसाठी मंगळग्रह…
(जळगाव) : भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या बहिणाबाई महोत्सवास शुक्रवारी सुरवात झाली. याठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पद्धतीने चैत्राम पवार यांनी उत्सवाचे उद्घाटन केले. या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, सत्यनारायण बाबा मौर्य यांचा भारत माता की आरती, ह. भ. प रविकिरण महाराज यांचे किर्तन,देशभक्तीपर गीते, वहीगायन ,भावगीते , मराठी संस्कृतीचा फॅशन शो, लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत. खाद्यपदार्थ आणि विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स याठिकाणी असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा झाली. चैत्राम पवार…
जळगाव प्रतिनिधी: जळगाव शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यात आले. ज्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवून लाखो मराठी मनांना स्वाभिमानाची ताकद दिली, अशा बाळासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करताना प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यांत अभिमान व हृदयात निष्ठेची ज्वाला दिसून येत होती. या वेळी संपूर्ण परिसर “बाळासाहेब अमर रहें”, “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद” अशा गगनभेदी जयघोषाने दुमदुमून गेला. बाळासाहेबांचे विचार, त्यांचा कणखर स्वभाव आणि अन्यायाविरुद्धची निर्भीड भूमिका आजही शिवसैनिकांना लढण्याची प्रेरणा देत असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात ठळकपणे जाणवत होती. या भावनिक क्षणी माजी जि प सदस्य प्रतापभाऊ पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख शाम…
जळगाव (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारी आक्रमक संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’ची महत्त्वपूर्ण बैठक येत्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र व जिल्हाध्यक्षांसह जिल्हास्तरीय नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत. ही महत्त्वाची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांची ‘वज्रमुठ’ अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या बैठकीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. बैठकीचा तपशील खालीलप्रमाणे: दिनांक: रविवार, १ फेब्रुवारी २०२६ वेळ: दुपारी १ वाजता स्थळ: पद्मालय शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस), जळगाव.…
राकेश वाणी: जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) मिळवलेल्या दणदणीत यशानंतर आता महापालिकेत सत्तेच्या समीकरणांना वेग आला आहे. गुरुवारी नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे शिवसेनेच्या नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी करण्यात आली. यामध्ये जिल्हाप्रमुख आणि नवनिर्वाचित नगरसेवक विष्णू भंगाळे यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे. नेत्यांच्या मार्गदर्शनाला मोठे यश नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला जळगावात मोठे यश मिळाले असून पक्षाचे २२ नगरसेवक निवडून आले आहेत. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या त्रिसूत्री नेतृत्वाखाली शिवसेनेने ही मुसंडी मारली आहे. या विजयामुळे जळगाव शहराच्या राजकारणात शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गट…
जळगाव: खानदेशची संस्कृती, परंपरा आणि अस्सल चवींचा वारसा जपणारा ‘बहिणाबाई महोत्सव’ यंदा आपल्या ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे. भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव २३ ते २७ जानेवारी दरम्यान जळगाव शहरात रंगणार असून, यंदाची ‘पंच परिवर्तन’ ही संकल्पना महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्याला भरारी फाउंडेशनचे संस्थापक दीपक परदेशी, विनोद ढगे, क्रेडाईचे अध्यक्ष दीपक सराफ, तुषार महाजन, राजेश खडके आणि पुष्कर नेहते यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जीवन गौरव पुरस्काराची घोषणा समाजासाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल यंदा महोत्सवात विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला…
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात अद्याप ‘ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर’ (AVTS) कार्यान्वित न झाल्यामुळे स्थानिक वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना (RTO) निवेदन देऊन फिटनेस चाचणीची जुनी पद्धत तात्पुरती सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. *२५० किलोमीटरचा प्रवास आणि आर्थिक भुर्दंड* निवेदनात नमूद केल्यानुसार, जळगाव जिल्ह्यात फिटनेस सेंटर नसल्यामुळे वाहनधारकांना फिटनेस चाचणीसाठी नाशिक (२५० किमी) किंवा छत्रपती संभाजीनगर (१५० किमी) येथे जावे लागत आहे. लांबच्या प्रवासामुळे इंधन खर्च, टोल, वाहनांची झीज आणि दोन ते तीन दिवसांचा रोजगार बुडत असल्याने वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान…
भडगाव -प्रतिनिधी : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा विषय समितीच्या निवडणूक नियम १९६६ मधील नियम ३ नुसार भडगाव नगरपरिषदेची विशेष सभा दि. २० जानेवारी रोजी नगरपरिषद सभागृहात पार पडली.या सभेत नगरपरिसदेच्या विविध विषय समित्यांची स्थापना करण्यात आली. ही सभा पिठासिन अधिकारी तथा भडगाव तहसीलदार शितल सोलाट व प्रभारी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या उपस्थितीत पार पडली. भडगाव नगरपरिषदेत आज झालेल्या विषय समित्यांची निवड रितसर प्रक्रिया पार पाडून बिनविरोध झाली. या समित्यांमध्ये स्थायी समिती सदस्य -लखीचंद प्रकाश पाटील,सार्वजनिक बांधकाम समिती सभापती – फकीर नगमाबी अलीमशाह,सदस्य- विजयकुमार रायभान भोसले,देवाजी आहीरे,युवराज पाटील,जितेंद्र पाटील ,शिक्षण समिती सभापती -अतुल परदेशी,सदस्य…
अमळनेर |पंकज शेटे : सोमवारी अमळनेर नगर परिषदेच्या सभागृहात विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया शांततेत व निर्विरोध पार पडली. नगर परिषदेतील विविध समित्यांवर सभापतीपदासाठी झालेल्या निवडीत सर्व पदांवर एकमताने निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक साहेबराव वसंत पवार यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी कैलास नामदेव पाटील, तर आरोग्य समितीच्या सभापतीपदी रामकृष्ण बापूराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी शेख नविद अहमद मुशिरोद्दीन, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी स्वाती सुरजसिंह परदेशी यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच योजना व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष प्रशांत मनोहर निकम यांची…

